November 30, 2021

परळी तालुक्यात गांजाची सामूहिक शेती !

परळी तालुक्यात गांजाची सामूहिक शेती !

परळी – एकीकडे पाच दहा ग्राम गांजा (हर्बल तंबाखू)बाळगल्याने अटकेत असलेल्या शाहरुख खानच्या पोरामुळे राज्यभर आरोप सुरू असताना बीड जिल्ह्यात चक्क गांजाची (हर्बल तंबाखू)ची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

सिनेअभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज (गांजा)प्रकरणी अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी तपास करणारे अधिकारी समीर वानखेडे यांचा जात धर्म काढत आरोपांची राळ उठवली.दहा पाच ग्राम गांजा सापडल्या नंतर जिथं मुंबई किंवा दिल्ली चे पोलीस मोठी कारवाई करतात तिथं बीड जिल्ह्यात मात्र गांजा सर्रास शेतात पिकवला जात असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही वर्षांपूर्वी परळी तालुक्यातील मोहा या गावात अफूची सामूहिक शेती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता,शेकडो एकर जमिनीवर अफूची शेती होत असल्याचे समोर आल्यानंतर शंभर पेक्षा अधिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते,आता याच तालुक्यात गांजाची शेती आढळून आल्याने खळबळ माजली आहे .

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघात असलेल्या हालांब या गावात गांजाची सामूहिक शेती केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.ग्रामीण पोलिसांनी या शेतीवर छापा घातला असता सामूहिक गांजाची लागवड केल्याचे दिसून आले.या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *