November 30, 2021

दिवाळीच्या तोंडावर शिक्षकांचे धरणे आंदोलन !

दिवाळीच्या तोंडावर शिक्षकांचे धरणे आंदोलन !

गेवराई – महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना चा प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्या संदर्भाने राज्याचे तसेच बीड जिल्हा परिषद अंतर्गत प्रश्नांसंबंधी जिल्हा शाखा बीड च्या वतीने जिल्हा परिषदेसमोर दिनांक 1 नोव्हेंबर 2021 सोमवारला धरणे आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.तरी या धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गेवराई शिक्षक समिती तालुकाध्यक्ष विशाल कुलकर्णी यांनी केले आहे.


या प्रलंबित मागण्या मध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत भेदभाव न करता जिल्हा परिषदेच्या इ.1 ली ते 8 वी मधील सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ मिळावा. मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांचा दैनिक उपस्थिती भत्ता 1 रुपया ऐवजी 25 रु.करावा. किशोरवयीन विद्यार्थिनी साठी शाळेत मोफत सॅनिटरी नॅपकिन व वापरलेले नॅपकिन नष्ट करण्यासाठी ची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शिक्षण सेवकांचे मानधन 6 हजार रुपया ऐवजी 25 हजार रुपये करावे.1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत समाविष्ट झालेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. वरिष्ठ व निवड श्रेणीतील जाचक अटी रद्द कराव्यात.

पूर्वाश्रमीच्या वस्तीशाळा शिक्षकांची प्रथम नेमणूक सेवा सर्व लाभासाठी ग्राह्य धरण्यात यावी. सर्व पदोन्नत्या करण्यात यावेत. प्रत्येक तालुक्यांना पदाचे गटशिक्षणाधिकारी देण्यात यावेत. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ही अविलंब चालू करण्यात यावी. थकित वेतन अदा करावेत. बीडीएस प्रणाली पूर्वीप्रमाणे चालू ठेवावी. त्यामध्ये खंड पडू नये. अशा अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय मागण्याचा या दिलेल्या निवेदनात समावेश करण्यात आला असून या जिल्हा परिषद बीड समोरील धरणे आंदोलनात गेवराई तालुक्यातील सर्व शिक्षक- शिक्षिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन तालुकाध्यक्ष विशाल कुलकर्णी,सचिव सौदागर कांबळे ,कार्याध्यक्ष दीपक पुरी,उपाध्यक्ष शिवाजी बांगर,प्रेम सिडाम,जिल्हा कार्याध्यक्ष लहू पवार ,मार्गदर्शक राम जोशी,अमोल मनकटवाड, रामनाथ दहिफळे,महादेव शिंदे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेश सोळसे यांनी केले आहे.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *