नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यानंतर फटाके फोडून जल्लोष साजरा करणाऱ्याना योगी आदित्यनाथ सरकारने दणका दिला आहे.भारतात राहून पाकिस्तानच्या विजयाबाबत जल्लोष करणाऱ्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनाचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने म्हटले आहे की, 24 ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करताना शेजारील देशाला पाठिंबा दिल्याच्या प्रकरणी यूपी पोलिसांनी सात जणांना अटक केली.
पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याचा आरोप असलेल्या तीन काश्मिरी विद्यार्थ्यांविरोधात आग्रा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गदारोळानंतर आग्रा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनाही व्यवस्थापनाने निलंबित केले होते. काश्मीरमधील तीन विद्यार्थ्यांनी आरबीएस इंजिनिअरिंग टेक्निकल कॅम्पसमध्ये पाकिस्तानच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला होता.
विद्यार्थ्यांनी व्हॉट्सएपवर स्टेटस टाकून पाकिस्तानच्या विजयाचे समर्थन करत देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका शिक्षिकेनं पाकिस्तानच्या विजयानंतर व्हॉट्स ऍप स्टेटस टाकत आनंद व्यक्त केला. या शिक्षिकेला खासगी शाळेनं नोकरीवरून कमी केलं आहे. तसेच, सामन्यानंतर पाकिस्तान समर्थक घोषणा दिल्याबद्दल जम्मू-काश्मीरच्या सांबा येथे आणखी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले