November 30, 2021

वादानंतर वानखेडे यांना झेड प्लस !

वादानंतर वानखेडे यांना झेड प्लस !

नवी दिल्ली- कार्तिलिया क्रूझ कारवाई नंतर राज्यातील मंत्री नवाब मलिक अन समीर वानखेडे यांच्यात सुरु झालेल्या वादानंतर केंद्र सरकारने वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.त्यांना आता झेडप्लस सुरक्षा देण्यात आली आहे .याबाबत केंद्र सरकारच्या गृहविभागाने राज्याला कळविले आहे .

सिनेअभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवरील ड्रग पार्टी प्रकरणी अटक केल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी चे समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत त्यांना जाहीर सभेतून धमकावले होते.

मलिक यांनी वानखेडे यांच्याबाबत थेट केंद्र सरकार अन एनसीबी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारकेली होती .दरम्यान आता त्यांच्या सुरक्षेत वाढ करून केंद्राने वानखेडे यांच्या पाठीशी असल्याचेच दाखवून दिले आहे .

समीर वानखेडे यांच्या लग्नाबाबत, त्यांच्या धर्माबाबत सध्या मोठा वाद सुरू आहे. समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाच्या मुद्द्यावरून देखील आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यांचं पहिलं लग्न एका मुस्लीम महिलेशी झालेलं होतं. मात्र, त्यावेळी समीर वानखेडे हे देखील मुस्लीमच होते, असा दावा त्यांचं लग्न लावणाऱ्या काझींनी केला आहे. समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मात्र आपण हिंदूच असल्याचं सांगितलं आहे. या मुद्द्यावरून अनेक शंका उपस्थित केल्या जात असून वाद निर्माण झाला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्राने सुरक्षेत वाढ केली आहे,त्याचसोबत एनसीबी ने वानखेडे यांच्या विरोधातील तक्रारींवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही अस स्पष्ट केलं आहे,त्यामुळे मलिक आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *