November 30, 2021

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 34 हॉलतिकिट !

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी 34 हॉलतिकिट !

बीड – राज्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ थांबायचं नाव घेत नाहीये.अचानक परीक्षा रद्द झाल्याने अगोदरच हैराण झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मानसिक त्रास झाला आहे.बीडमधील पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याला चक्क एक नव्हे दोन नव्हे तर 34 हॉलतिकिट आले आहेत.

पृथ्वीराज अरुण गोरे (रा. शहाबाजपूर, ता.जि. बीड) या विद्यार्थ्याने २० ऑगस्ट रोजी आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यात त्याने औरंगाबाद विभागाची निवड केली होती. मात्र, त्याला एक-दोन नव्हे तर तब्बल ३४ हॉलतिकीट मिळाले आहेत. हे पाहून पृथ्वीराजही अवाक् झाला. त्याने हॉलतिकीटवरील क्रमांकावर संपर्क साधला. यावर त्याला एकाने औरंगाबाद, तर दुसऱ्याने राज्यात कुठेही परीक्षा देण्याचा सल्ला दिला.

आरोग्य विभागाच्या कारभाराबाबत नेहमीच गोंधळ दिसून आला आहे.कधी परीक्षा अचानक रद्द होतात तर कधी एकाच विद्यार्थ्याला दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देण्याची वेळ येते.हे कमी म्हणून की काय आता तर कहरच झाला आहे.पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याला चक्क 34 हॉलतिकिट आले आहेत .

हा सगळा गोंधळ उगड्या डोळ्यांनी पाहणारे आरोग्यमंत्री मात्र यावर काहीच प्रतिक्रिया देत नाहीत हे विशेष .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *