December 10, 2022

लाडू,करंज्या करताना ही काळजी घ्या !

लाडू,करंज्या करताना ही काळजी घ्या !

बीड- दिवाळीचा सण चार दिवसांवर येऊन ठेपलाय, घराघरात गृहिणींची धावपळ सुरू झाली आहे,गतवर्षी कोरोनामुळे ना फराळ झाला ना फटाके,मात्र यंदा जोरात दिवाळी साजरी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे .दिवाळीचा फराळ तयार करताना लाडू अन करंज्या हे महत्त्वाचे आयटम आहेत,मात्र अनेकदा ते तयार करताना अडचणी येतात,आम्ही काही टिप्स देतोय त्या फॉलो करा अन खुसखुशीत करंज्या लाडू तयार करा.

ला़डू आणि करंज्या हे तर दिवाळीच्या पदार्थांमधील सर्वात महत्त्वाचे पदार्थ. गोडाचे म्हणून विशेष मान असलेले हे पदार्थ अनेकदा सुरुवातीला केले जातात. यातही प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे रव्याचे, रवा-बेसनाचे, बेसनाचे असे वेगवेगळ्या प्रकारचे लाडू केले जातात. करंज्यांमध्येही सारणाच्या, ओल्या नारळाच्या, साटं लावून अशा एकाहून एक पद्धतीने करंज्या केल्या जातात. लक्ष्मीपूजन, पाडवा यादिवशी देवासमोर नैवेद्य दाखवायला आणि भाऊबीजेला भाऊरायाचे तोंड गोड करण्यासाठी लाडू, करंजीचे विशेष महत्त्व असते. हेच लाडू आणि करंजी फसू नयेत आणि परफेक्ट व्हावेत यासाठी काही सोप्या टिप्स पाहूया…

करंजीच्या कडा अनेकदा तेलात फुटतात. त्यामुळे आतले सारण तेलात पसरते आणि तेलही खराब होते. असे होऊ नये म्हणून त्या कडांना कापसाच्या बोळ्याने दूध लावावे.

करंजी करताना मोहन शक्यतो चांगल्या तुपाचे घालावे. चांगले तूप नसेल तर तेलाचे मोहनही चालते. मोहन थंड झाल्यावर पीठाला चांगले मळून घ्यावे. करंज्याचे पीठ नीरशा दुधात तिंबावे. अर्ध्या तासाने लगेचच करंज्या करायला घ्याव्यात. यामुळे करंज्या अतिशय सुंदर खुसखुशीत होतात.करंजीच्या वरच्या आवरणासाठी भिजवलेले पीठ शेवटपर्यंत मऊ राहावे यासाठी पीठ भिजवल्यानंतर सुती कपडा ओला करुन तो त्याभोवती गुंडाळून ठेवा.

रव्याच्या लाडूसाठी रवा भाजल्यावर खाली उतरवून त्यावर चार चमचे दूध शिंपडावे. रवा छान फुलतो. लाडूला छान चव येते.रवा लाडू उत्तम होण्यासाठी पाक झाल्यावर त्यात मिल्क पावडर घालावी मग भाजलेला रवा घालावा. यामुळे लाडू तोंडात विरघळेल इतका मऊ होतो.

बेसनाचे लाडू चांगले होण्यासाठी बेसन खमंग भाजून घेतल्यावर त्यावर एक वाटीला एक चमचा दूध या प्रमाणाने दूध शिंपडावे. लाडूला छान खमंग चव येते.बेसनाचे लाडू करताना बेसन भाजून घेतल्यानंतर ते कोमट असताना एका वाटीला एक चमचा या प्रमाणात मिल्क पावडर घातल्यास लाडू अतिशय सुरेख होतात. बेसनाच्या लाडूला तूप योग्य प्रमाणात घ्यावे. अन्यथा लाडू खूप सैल होतात नाहीतर जास्त कडक होतात.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click