November 27, 2021

जिल्ह्यातील शाळांना एकवीस दिवस सुट्या !

जिल्ह्यातील शाळांना एकवीस दिवस सुट्या !

बीड – तब्बल वर्षभर कोरोनामुळे बंद असलेल्या अन महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या शाळांना दिवाळीनिमित्त 1 ते 21 नोव्हेंबर पर्यंत सुट्या असणार आहेत.याबाबतचे शिक्षण विभागाचे पत्र तयार झाले असून आज उद्या ते शाळांना मिळेल.

बीड जिल्ह्यात पाचवी ते बारावीच्या शाळा अन महाविद्यालय ऑक्टोबर महिन्यापासून सुरू झाले.अद्याप पहिली ते चौथी च्या शाळा सुरू झालेल्या नाहीत.

दरम्यान जिल्ह्यातील शाळांना दिवाळीच्या सुट्या मिळणार की नाही,किती दिवसांच्या मिळणार याबाबत शिक्षक,पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये उत्सुकता होती .आसपासच्या जिल्ह्यात एकवीस दिवसाच्या सुट्या देण्यात आल्या आहेत.मात्र बीड जिल्हा परिषदेने याबाबत अद्याप निर्णय न घेतल्याने शिक्षक वर्ग हैराण झाला होता.

दरम्यान आता एक ते एकवीस नोव्हेंबर दरम्यान शाळांना सुट्या मिळणार आहेत.या दरम्यान 11 आणि 12 तारखेला राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा असल्याने ज्या शाळांचा यात सहभाग असेल त्या शाळांना दोन दिवस सुट्टी नसेल,उर्वरित सर्व शाळा या एकवीस दिवस बंद असतील.

याबाबतचे शिक्षण विभागाचे पत्र तयार झालेय मात्र त्यावर अद्याप शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी झालेली नसल्याने आज संध्याकाळ पर्यंत हे पत्र सर्व शाळांना वितरित होईल .त्यामुळे इतर जिल्ह्याप्रमाणे बीफ जिल्ह्यातील शाळांना देखील 21 दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *