बीड – जिल्ह्यातील केवळ चार तालुक्यात सध्या कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आहेत,मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात अंबाजोगाई, आष्टी ,धारूर आणि वडवणी या चार तालुक्यात मिळून नऊ रुग्ण सापडले आहेत .इतर सात तालुके सध्या तर शून्यावर आहेत .
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई 1,आष्टी 4,धारूर 3 आणि वडवणी मध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे .जिल्ह्यातील 594 रुग्णांची तपासणी केली असता त्यात सात तालुक्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही .
बीड जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आल्याचे चित्र असून जवळपास सर्वच तालुक्यातील कोविड केयर सेंटर बंद करण्यात आलेले आहेत.केवळ जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत .