बीड – देवस्थानच्या जमिनी पुढारी अन धनदांडग्यांच्या घशात घालणाऱ्या उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने नामंजूर केला आहे,शेकडो कोटी रुपयांच्या जमिनी कवडीमोल भावाने विकून स्वतः कोट्यवधी कमावणाऱ्या आघाव सारख्याना जिल्हा प्रशासन का पाठीशी घालत आहे असा सवाल विचारला जात आहे .
बीड जिल्ह्यातील आष्टी,पाटोदा,परळी,केज,गेवराई, बीड,माजलगाव अशा अनेक तालुक्यातील शेकडो एकर जमीन ज्या देवस्थानच्या नावावर आहेत,त्या अधिकाऱ्यांनी नेणं गुत्तेदारा यांच्या घशात घातल्या.
विशेषतः नरहरी शेळके असोत की प्रकाश आघाव पाटील यांच्या सारखे उपजिल्हाधिकारी यात आघाडीवर होते.आमदार,खासदार,मंत्रीच आपल्या सोबत आहेत म्हणल्यावर कोण काय वाकड करणार अस समजून आघाव सारख्यानी आघावपणा करायला काहीच कसूर सोडली नाही .
मात्र देवाला फसवणाऱ्या आघाव सारख्यांचे बिंग फुटले अन या प्रकरणात राम खाडे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी लक्ष घातले.अनेक दिवस,महिने वर्ष पाठपुरावा केल्यानंतर आता या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत.बडतर्फ करण्यात आलेला उपजिल्हाधिकारी नरहरी शेळके याच्या अटकेनंतर आता आघाव पाटील याचाही अटकपूर्व जामीन फेटाळला आहे .
आता तरी जिल्हाधिकारी हे या प्रकरणात अशा मस्तवाल अन आघावपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करून बडतर्फीचा प्रस्ताव पाठवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे .