नवी दिल्ली – कोरोनाच्या दोन व्हेरियंट चा धोका कमी होत असताना एक धक्कादायक बाब समोर आली आहे.ब्रिटनमध्ये आढळून आलेला A Y.4.2 नावाचा व्हेरियंट भारतात देखील आढळू शकतो असे सांगत यंत्रणा खबरदारी घेत आहे .मात्र यामुळे डेल्टा किंवा अल्फा इतका धोका होऊ शकतं नाही अस तज्ञ सांगतात .
ब्रिटन आणि यूएसए मध्ये सार्स च्या डेल्टा व्हेरिएंटचा धोकादायक उपप्रकार सापडल्यानंतर आता भारतात देखील खबरदारी घेतली जात आहे. AY.4.2 असं या नव्या व्हेरियंटचे नाव असून सध्या हाय अलर्ट मोडवर आहे. कारण, शास्त्रज्ञांनी याआधीच असं सूचित केलंय की व्हायरसचा हा नवीन प्रकार डेल्टा स्ट्रेनपेक्षा अधिक संक्रमणीय असू शकतो.
एकीकडे भारतासह संपूर्ण जगात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमध्ये घट झाली असताना आता दुसरीकडे ब्रिटनमध्ये हा नवा व्हेरियंट चिंतेचं कारण ठरला आहे. हाच व्हेरियंट भारतातील संशोधकांच्या चिंता वाढवतो आहे. अधिकृत आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये 24 तासात 223 अचानक मृत्यू झाल्याने दहशत पसरली आहे, त्यामुळेच भारतात देखील अधिक खबरदारी घेतली जात आहे.
याबाबत प्रथम जुलै 2021 मध्ये माहित झाले होते. डेल्टा व्हेरिएंटमध्ये काही नवीन उत्परिवर्तन आहेत, जे स्पाइक प्रोटीनवर परिणाम करतात. तज्ज्ञ सांगतात की AY.4.2 संभाव्यतः अधिक संसर्गजन्य आहे. परंतु याची तुलना डेल्टा किंवा अल्फा व्हेरिएंटशी केली जाऊ शकत नाही जी 50 ते 60% अधिक संसर्गजन्य होती.