नवी दिल्ली : ‘कू’ हा भारतातला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून उद्याला येतो आहे. आगामी टी-२० विश्वचषकाचे निमित्त साधून ‘कू’ घेऊन आला आहे भारतातला सर्वात मोठा क्रिकेट अनुभव – #sabsebadastadium. या मोहिमेच्या माध्यमातून तुम्हाला वर्ल्ड कपचा एक आगळावेगळा, रोमांचक आणि हायपरलोकल अनुभव घेता येईल, तोसुद्धा तुमच्या मातृभाषेत!
वर्ल्ड कपदरम्यान ‘कू’चा मंच सुसंवादी पोस्ट्सने गजबजून जाईल. अनेक दिग्गज क्रिकेटपटू, समालोचक, सेलिब्रिटीज आणि माध्यमसंस्था तुमच्यासोबत रंजक चर्चा करत सामन्यांच्या लाइव्ह अपडेट्स देत राहतील. समालोचक ‘कू ऑफ द मॅच’, ‘कू फॅन ऑफ द मॅच’, ‘कू पोल ऑफ द मॅच’ यासारख्या थीम्सच्या माध्यमातून सामन्यांचे आगळेवेगळे विश्लेषण करतील.
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘कू’ एक रोमांचक स्पर्धा – ‘कू क्रिएटर कप’ आयोजित करणार आहे. यातून ‘कू’वरच्या सक्रीय युजर्सना त्यांची सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळणार आहे. मॅच किंवा खेळाडूंबाबतचे गंमतीशीर मीम्स, व्हीडिओज किंवा रिअल-टाइम ‘#कूमेंट्री’च्या माध्यमातून हे करता येईल. यातल्या निवडक चमकदार विजेत्यांना मालदीव प्रवासाची संधी, मॅकबुक एअरसारखी आकर्षक बक्षिसेसु्दधा मिळतील. याव्यतिरिक्त, क्रिकेटप्रेमासाठी मंचावर दाखल झालेल्या चाहत्यांना सुरेख अनुभव मिळावा म्हणून अनेक नवी फीचर्सही ‘कू’ने आणली आहेत.
अलीकडच्या काळात ‘कू’वर क्रिकेटभोवती गुंफलेल्या चर्चा आणि संवाद अजूनच वेगवान झाले आहेत. या चर्चांना स्थानिक रंगरूप आहे.
‘कू’वर आता अनेकानेक दिग्गज खेळाडू दाखल झालेत. यात वीरेंद्र सेहवाग, व्यंकटेश प्रसाद, निखिल चोप्रा, सय्यद सबा करीम, पियुष चावला, हनुमा विहारी, जोगिंदर शर्मा, प्रवीण कुमार, व्हीआरव्ही सिंग, अमोल मुझुमदार, विनोद कांबळी, वसीम जाफर, आकाश चोप्रा, दीप दासगुप्ता यांचा समावेश आहे. चाहत्यांशी कनेक्ट होत अगदी रंजक आणि खास माहिती, टिप्पण्या व ज्ञान हे सगळेजण शेअर करत आहेत. सोबतच अनेक लोकप्रिय समालोचकही ‘कू’वर आले आहेत.
क्रिकेटपटू आणि समालोचक ‘बहुभाषिक कूइंग’ सारख्या वैशिष्ट्यांचा वापर करत या मंचावर खेळाबद्दलचे मोलाचे ज्ञान आणि एक्सक्लुजिव्ह माहिती प्रादेशिक भाषांमध्ये शेअर करत आहेत. यातून भारतभरातील युजर्सना एक आगळावेगळा अनुभव मिळतो आहे.
कूच्या प्रवक्त्याने सांगितले, “भारतीय क्रिकेटवर कमालीचे प्रेम करतात. क्रिकेट हा भारतात जणू एक सण आहे, जो वर्षभर विविध रूपात साजरा केला जातो, देशातल्या लोकांना एकत्र बांधतो. यापूर्वी कधीही भारतीयांना त्यांच्या आवडत्या खेळाडूंचं नाव घेत मातृभाषेत चिअरिंग करण्याची, त्यांच्या मातृभाषेत क्रिकेट अनुभवण्याची संधी मिळाली नव्हती. नुकत्याच झालेल्या आयपीएलदरम्यान आम्हाला युजर्सकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला. सेहवाग, आकाश चोप्रा आणि इतरही स्टार क्रिकेटपटूंनी चाहत्यांशी मातृभाषेत संवाद साधला. हा अनुभवच अनोखा होता. आयपीएलदरम्यानच्या या यशस्वी प्रयोगाने आम्हाला टी-२० विश्वचषकाच्या मोहिमेसाठी मोठीच प्रेरणा मिळालीय.