November 30, 2021

विरुची कु वर धडाकेबाज ओपनिंग !

विरुची कु वर धडाकेबाज ओपनिंग !

नवी दिल्ली- भारताचा धडाकेबाज माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने कु या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर देखील जोरदार ओपनिंग केली आहे .आपल्या विनोदी शैलीमुळे फॅन्सचा आवडता असणाऱ्या विरुने एक लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे .

या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर दाखल झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत सेहवागच्या खुमासदार, विनोदी कमेंट्स, गंमतीशीर टिप्पण्या यांनी अल्पावधीतच लोकांचे लक्ष वेधून घेतले. सध्या त्याचे हॅंडल @VirenderSehwag चाहत्यांचा जोरदार प्रतिसाद आणि वाहवा मिळवते आहे.
भारतीय भाषांमध्ये खुलेपणाने व्यक्त होण्यासाठीचा खुला मंच म्हणजे ‘कू’. क्रिकेटचा हंगाम सुरू झाला तसे अलिकडेच अनेक प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि समालोचक ‘कू’वर दाखल झाले आहेत. सोबतच यातून अॅपच्या डाउनलोड्समध्येही वेगाने वाढ झाली आहे.

मार्च २०२० मध्ये हा प्लॅटफॉर्म लाँच झाल्यापासून केवळ २० महिन्यांच्या कालावधीत ‘कू’वरच्या युजर्सची संख्या तब्बल १.५ कोटी (१५ दशलक्ष) इतकी झाली आहे. आणि यापैकी वापरकर्ते, सुमारे ५ दशलक्ष वापरकर्ते गेल्या दोन महिन्यांत या मंचावर आले आहेत.

भारतीयांचे जगावेगळे क्रिकेटप्रेम आणि त्याचा थरार यांच्यावर स्वार होत ‘कू’ अजूनच वेगाने वाढते आहे. सध्या सुरू असलेली टी-२० विश्वचषक मालिका रंगेल तशी ही प्रक्रिया अजूनच गतिमान होईल, देशभरातून मिळणारा प्रतिसाद वाढेल, यात शंका नाही.
‘कू’ युजर्स आणि कंटेट क्रिएटर्ससाठी आकर्षक कॅम्पेन्स आणि स्पर्धा घेऊन आले आहे. यंदाचा टी-२० विश्वचषक हा एक अनोखा आणि हायपरलोकल अनुभव व्हावा हाच ‘कू’चा प्रयत्न आहे. सेहवाग व्यतिरिक्त व्यंकटेश प्रसादसारखे आघाडीचे क्रिकेट स्टार्स, निखिल चोप्रा, सय्यद सबा करीम, पियुष चावला, हनुमा विहारी, जोगिंदर शर्मा, प्रवीण कुमार, व्हीआरव्ही सिंग, अमोल मुझुमदार, विनोद कांबळी, वसीम जाफर, आकाश चोप्रा, दीप दासगुप्ता हे सगळेसुद्धा ‘कू’वर युजर्सना नियमित भेटतील. या सेलिब्रिटी क्रिकेटर्सशी कनेक्ट होण्याचा आनंद मिळवायचा असेल तर ‘कू’वर सक्रिय व्हा.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *