बीड – काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून अचानक दूर करण्यात आल्याने नाराज झालेले राजकिशोर उर्फ पापा मोदी यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह मुंबई येथे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला .यावेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे ,आ संदिप क्षीरसागर उपस्थित होते .
गेल्या वीस पंचवीस वर्षांपासून अंबाजोगाई आणि परिसरात काँग्रेस चे वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी झालेले पापा मोदी हे काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले होते,मात्र दोन महिन्यांपूर्वी राजेसाहेब देशमुख यांची नियुक्ती झाली अन पापा मोदी नाराज झाले .
गेल्या पंधरा वर्षांपासून अधिक काळ अंबाजोगाई नगर पालिका,अंबाजोगाई बँक,शिक्षण संस्था या माध्यमातून मोदी यांनी काँग्रेस चे जाळे निर्माण केले होते.मात्र जिल्हाध्यक्ष झाल्यावर ते फारसा प्रभाव टाकू शकले नाहीत .त्यामुळे पक्षाने त्यांना बाजूला केले, यातून नाराज झालेले मोदी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले आहेत .