November 30, 2021

नेहमीप्रमाणे गुटखा पकडला अन मुळे आबा पळाला !

नेहमीप्रमाणे गुटखा पकडला अन मुळे आबा पळाला !

बीड – जिल्हा पोलिस अधीक्षक आर रामस्वामी यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थापन केलेल्या पथकाने चकलांबा हद्दीत विक्री होणाऱ्या गुटख्याच्या गोदामावर छापा घातला,नेहमीप्रमाणे गुटखा पकडला मात्र त्याचा जो मुळमालक आहे तो मुळे आबा पोलिसांना काही सापडला नाही .पोलिसांनी अनेक कारवाया (दाखवण्यासाठी का होईना) केल्या,गुटखा पकडल्याचा दाखवले मात्र याचा व्यापार करणारा किंग गुटखा माफिया मुळे आबा अजूनही पोलिसांना सापडलेला नाही .छापा घालणारे किंवा घालण्याचा आदेश देणारे कोणी ना कोणी त्याच्याकडून होणारी लक्ष्मीदर्शन मुळे उपकृत झाले असावेत त्यामुळेच हा माफिया खुलेआम फिरतो आहे .

दिनांक 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 18.00 वाजता चकलांबा पोलिस ठाणे हद्दीतील उमापूर गावा लगतच्या मारुतीचीवाडी या वस्तीजवळ आरोपी नामे सोपान विठ्ठलराव भोसले यांच्या शेतामध्ये असलेल्या गोडाऊन मध्ये आयशर टेम्पो MH 11 M 4553 यामधून गुटखा उतरून गोडाऊन मध्ये काही इसम साठा करत असताना छापा मारला असता पाच इसमांना जागीच पकडण्यात आले.

त्यामध्ये 1)अजित अशोक पाटणे रा. उमापूर (गुटका मालक) 2) विठ्ठल विष्णू काठोळे रा. नामलगाव फाटा, बीड (टेम्पो चालक) 3) सुदाम बाबासाहेब काठोळे रा. नामलगाव फाटा,बीड (लेबर) 4) रामेश्वर विष्णू कातकडे रा. उमापूर (लेबर ) 5) नवनाथ अशोक राऊत रा.उमापुर (लेबर) आणि टेम्पो व गोडाऊनमधील एकूण 12 लाख 3 हजार 800 रुपये किमतीचा गुटका, सोबतचा आयशर टेम्पो 5 लाख रुपये किमतीचा जुनाअसा एकूण 17,03,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

चकलांबा पोलिस ठाणे मध्ये जागीच पकडलेले 5 आरोपी आणि आयशर टेम्पो मालक, गुटख्याचा भागीदार मालक नामे बाळू बाबुराव बहिरवाळ उर्फ बाळू गुजर, गोडाऊन भाड्याने देणारे गोडाऊन चे मालक सोपान विठ्ठलराव भोसले असे 8 आरोपी विरुद्ध भादवि कलम 328, 272, 273,34 सह मोटार वाहन कायदा 130(3)/177 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *