बीड – विजयादशमी निमित्ताने सर्वाधिक महत्व असलेल्या आपट्याची पाने (सोनं) याचे आयुर्वेदिक पद्धतीमध्ये खूप मोठे महत्व आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल.पित्त कफ या दोषांवर आपट्याची पाने गुणकारी आहेत,मात्र हे उपाय करताना आपल्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या .
विजयादशमी च्या दिवशी आपट्याची पाने देवीला वाहून सीमोल्लंघन केले जाते,तसेच एकमेकांना ही पाने सोन म्हणून दिली जातात .मात्र दुसऱ्यादिवशी रस्त्यावर तर आपट्याच्या पानांचे ढिगारे कचऱ्यात दिसतात. अशावेळी वाईट वाटतं. पण ही आपट्याची पाने आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायद्याची आहेत. आपट्याची पाने खाऊन तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता.आपटा ही बहुगुणी वनस्पती आहे. या झाडाची पाने फुले, बिया, सालं औषध म्हणून वापरली जाते.
आपट्याला ‘अश्मंतक’ म्हणूनही ओळखले जाते. अश्मंतक’ याचा एक अर्थ मुतखडा होऊ न देणारा किंवा तो जिरवणारा असा आहे. आपट्याच्या सालीपासून दोरखंड बनवला जातो. तर त्याच्या सालापासून डिंक मिळतो. पण त्याव्यतिरिक्तही आपट्याचे बरेच फायदे आहेत.
आपट्याची पानं पित्त आणि कफ दोषांवर गुणकारी आहेत.लघवीच्या वेळी जळजळ होत असल्यास आपट्याची पाने पाण्यात चांगली ओली करून ती नीट वाटून घ्यावीत. जेवढा रस निघेल तेवढ्याच प्रमाणात दूध-साखर टाकावे. हा दिवसातून चार – पाच वेळा घेतल्याने जळजळ कमी होते.हृदयाला सुज आली असेल तर आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळवून ते मिश्रण गाळून प्यावे.
गालगुंड झाली असल्यास आपट्याची साल पाण्यात शिजवून घ्यावीत. तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून तो प्यावा किंवा गंडमाळेवर आपट्याची सालं बांधावीत.आपट्याच्या बियांचे बारीक चूर्ण करून ते तूपात चांगले मिक्स करावे. हे मलम एखादा किटक चावल्यास लावता येते. त्यामुळे दाह कमी होतो.मुरडा झाला असेल तर आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण मध आणि साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो.
आपट्याच्या पानांचा वापर करताना आपल्या डॉक्टर ला संपर्क जरूर करा,त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणताही उपाय केल्यास त्यामुळे अपाय होऊ शकतो .