November 30, 2021

जोशीज क्लासेसचा जेईई मध्ये डंका !

जोशीज क्लासेसचा जेईई मध्ये डंका !

बीड(प्रतिनिधी): बीडच्या शैक्षणिक पंढरी मानल्या जाणाऱ्या उमाकिरण शैक्षणिक संकुल येथील जोशीज मॅथस क्लासेसच्या कु गायत्री बागुल, चि कनिष्क जाधव व चि सौरभ वीर या तीन विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील जेईई ऍडव्हान्स २०२१ या परीक्षेत यशस्वी होऊन ते भारतातील आय आय टी या नामांकित व अग्रगण्य संस्थेमध्ये अभियांत्रिकी प्रवेशा साठी पात्र ठरले आहेत.

विशेषतः आय आय टी प्रवेश परीक्षा म्हटलं की बहुसंख्य विद्यार्थी कोटा, पुणे, मुंबई अशा ठिकाणी जातात,परंतु अत्यंत कमी वयात कुटुंबापासून दूर राहणे, त्याठिकाणी असलेलं नवीन वातावरण,त्यातूनच राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेची जीवघेणी स्पर्धा,या सर्व तणावामुळे लाखो रुपये खर्चूनही प्रत्येक जणच यशस्वी होतोच असे नाही. परंतु जर आपल्या कडे आत्मविश्वास, दृढनिश्चय,वेळेचं योग्य नियोजन, सातत्य, परिश्रम व योग्य मार्गदर्शन असेल तर आपल्याच शहरात राहूनही अशा प्रकारच्या परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकतो हेच या तीन विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे.

त्यामुळे शहरातील विविध शिक्षणतज्ज्ञ, पालक, क्लासेस चे मार्गदर्शक शिक्षक या सर्वांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. आतापर्यंत राष्ट्रीय पातळीवरील,तसेच राज्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून हजारो विद्यार्थ्यांनी नावलौकिक वाढवलेल्या जोशीज मॅथस क्लासेस च्या शिरपेचात हा आणखी एक मानाचा तुरा आहे. कोविड नंतर च्या शैक्षणिक परिस्थितीला अनुसरून,तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार योग्य ते बदल करून बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जेईई सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांसाठी सक्षम करण्याकडे क्लासेस ची वाटचाल असेल, असे प्रतिपादन जोशीज मॅथस क्लासेस चे संचालक प्रा सुनिल जोशी यांनी केले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *