छत्तीसगड – एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री भुपेश बघेल हे दारूबंदी साठी पुढाकार घेत असताना दुसरीकडे त्यांच्याच सहकारी महिला मंत्री या लोकांना “थोडी थोडी पिया करो “असा सल्ला देत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
छत्तीसगड च्या महिला बाल विकास मंत्री अनिला भेंडीया यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत.त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस चे सरकार अडचणीत आले आहे. त्यांनी एका कार्यक्रमात “झोपायच्या आधी एक पेग घेत जा, जेणेकरून तुम्ही तणावातून मुक्त होऊ शकाल.’ अस म्हटल्याने आता वाद निर्माण झाला आहे.
अनिला भेडिया म्हणाल्या आहेत की, ‘महिला घर आणि कुटुंबाची काळजी घेतात. त्यांना मानसिक तणाव जाणवतो. अशा परिस्थितीत थोडी थोडी प्या आणि झोपा.’ आपल्या वक्तव्यावरून वाद वाढत असल्याचे पाहून त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे. त्या म्हणल्या, ‘मी दारूच्या आहारी गेलेल्या पुरुषांना संबोधित करत होते आणि मी त्यांना म्हणाली की कमी प्यायला हवी. घर आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांना खूप मानसिक दबावाला सामोरे जावे लागते. मला म्हणायचे होते की दारूचे व्यसन वाईट आहे आणि प्रत्येकाने त्यापासून दूर राहायला हवं.’