December 6, 2022

पंकजा मुंडे गोंधळलेल्या – धनंजय मुंडे यांचा पलटवार !!

पंकजा मुंडे गोंधळलेल्या – धनंजय मुंडे यांचा पलटवार !!

परळी – सत्ताधारी म्हणतात की सरकार टिकेल तर विरोधी पक्षातले नेते रोज सरकार पडणार असल्याचे दावे करतात, हे थांबवले पाहिजे असा सल्ला आज माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून दिला होता. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, ताई स्वतः पण त्याच विरोधी पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत व त्या त्यांच्या पक्षातील नेत्यांशी विसंगत बोलतात व सल्ले देतात, त्या गोंधळल्या तर नाहीत ना? असा मिश्किल सवाल सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विचारला आहे .

ऊसतोड कामगार महामंडळासाठी आमच्या सत्ता काळात मला हवं तसं काम करता आलं नाही, आता कामगारांची नोंदणी प्रत्यक्षात सुरू झाली आहे. पण सत्ताकाळात काही करता आले नाही असे म्हणून पंकजाताई मुंडे यांनी आपल्या अपयशाची जाहीर कबुलीच दिली आहे. त्यावेळी तुमचे तीन-तीन खात्याचे मंत्रिपद कुणाला भाड्याने दिले होते? असा सवाल उपस्थित करत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले.

आम्ही मात्र ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सामाजिक न्याय विभागाकडे वर्ग केल्यापासून सातत्याने राज्यातील ऊसतोड कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत व आता त्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे, त्यामुळे आम्ही अ कल्याणकारी आहोत का कल्याणकारी आहोत हे येणाऱ्या काळात जनता ठरवेल असेही धनंजय मुंडे एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाले.

व्यसनमुक्तीसाठीच्या संकल्पाचे स्वागतच

दरम्यान आज झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजाताई मुंडे यांनी व्यसनमुक्ती बाबत जाहीर केले, यावर प्रतिक्रिया विचारली असता, धनंजय मुंडे यांनी व्यसनमुक्ती हा माझ्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येतो; या सत्कार्यासाठी त्या योगदान देणार असतील तर त्यांचे स्वागत व आभार मानतो अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

मराठवाड्याला मिळणार 19.29 टीएमसी पाणी, मुंडेंनी मानले जयंत पाटील यांचे आभार

आज दसऱ्याच्या दिवशी मध्य गोदावरी उपखोऱ्यातील 19.29 टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यास वापरायची मान्यता दिल्याने याचा फायदा बीडसह मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांना होणार आहे. पाण्यावाचून थांबलेल्या विविध प्रकल्पाच्या कामातील पाणी उपलब्धता प्रमाणपत्र व अन्य अडथळे या निर्णयाद्वारे दूर होणार असून याबद्दल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानतो असेही धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले.

माहूरगड येथे दर्शन..

ना. धनंजय मुंडे यांनी आज दसर्‍याच्या मुहूर्तावर माहूर येथील रेणुका मातेचे सपत्नीक दर्शन घेतले .

माहूर हे मुंडे कुटुंबीयांचे कुलदैवत असून प्रत्येक वर्षी ते दसऱ्याच्या दिवशी माहूर येथे दर्शनासाठी जातात आजही त्यांनी माहूर येथे दर्शन घेतले व अतिवृष्टी मुळे राज्यातील शेतकऱ्यांवर आलेले संकट दूर करण्याचे बळ मिळो, कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर होवो अशी प्रार्थना केली.

तद्नंतर परळी येथे परतल्यानंतर धनंजय मुंडे गोपीनाथगड येथे जाऊन स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळी देखील नतमस्तक झाले.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click