November 30, 2021

परळीतून रिव्हॉल्व्हर सह काडतुसे जप्त !

परळीतून रिव्हॉल्व्हर सह काडतुसे जप्त !

परळी -परळी शहरात आज (दि.15) रोजी दसर्याच्या दिवशी गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी शहरातुन तीन अत्याधुनिक रिवॉल्वर व आठ काडतुसे जप्त केल्याची माहिती हाती आली असुन या प्रकरणात मध्य प्रदेश येथील एकास ताब्यात घेतले आहे.याबाबत परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

परळी शहर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवत आजवरची मोठी कार्यवाही केली आहे. मध्य प्रदेशातील एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकरवी देण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर तीन अत्याधुनिक रिव्हॉल्व्हर आणि 8 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलीस निरीक्षक हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कार्यवाही गुन्हे शोध पथकाचे प्रमुख भास्कर केंद्रे, शंकर बुडडे, गोविंद भताने,श्रीकांत राठोड मधुकर निर्मळ यांनी केली. ऐन विजयादशमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी मध्य प्रदेशातील एका एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर शोध घेत पोलिसांनी ही कार्यवाही केली. मराठवाड्यातील ही सर्वात मोठी कार्यवाही समजली जाते आहे. या घटनेतील आणखी धागेदोरे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत असून रात्री उशिरपर्यंतही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूच असून वरिष्ठ अधिकारी पोलीस ठाण्यात पोचले आहेत. परळी शहर पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे,

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

hotel_anvita

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *