मुंबई – राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तात्काळ जामीन मंजूर करण्यात आला आहे .
मागील वर्षी अनंत करमुसे या व्यक्तीला आव्हाड यांच्या शासकीय बंगल्यावर मारहाण झाली होती,या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील झाला होता,मात्र तब्बल पंधरा महिन्यांनी या प्रकरणी मंत्री आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली, त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
आव्हाड यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे तर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणात उशिरा का होईना न्याय मिळाला अशी प्रतिक्रिया दिली आहे .