मुंबई – आयपीएल च्या आपल्या पहिल्या सामन्यात विजय मिळवलेल्या कोलकाता नाईट रायडर्स च्या संघाकडून केवळ नितीश राणा ने केलेलं अर्धशतक अन 153 धावाच लो स्कोर टार्गेट असताना कोलकाता ने केलेल्या गचाळ फलंदाजी मुळे मुंबईने कोलकाता चा सहज पराभव केला अन आपला पहिला विजय प्राप्त केला .कोलकाता कडून नितीश राणा ने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले .
मुंबई आणि कोलकाता मध्ये झालेल्या पहिल्या अन आयपीएल च्या चौथ्या सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारलेल्या कोलकाता ने सटीक गोलंदाजी केली .ठराविक अंतराने मुंबईला धक्के देत कोलकाता ने अवघ्या 152 धावांवर मुंबईला रोखण्यात यश मिळवले .
हे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या कोलकाता ची सुरवात चांगली झाली .एकीकडून नितीश राणा टिच्चून फलंदाजी करत असताना दुसरीकडे मात्र विकेट पडण्याचा सिलसिला सुरूच होता .153 धावांची गरज असताना कोलकाता ने गचाळ फलंदाजी केली अन हातात असलेला सामना धावानी गमावला .मुंबईकडून राहुल चाहर ने चार विकेट घेतल्या .