November 26, 2022

दिनविशेष !

दिनविशेष !

4 मार्च रोजी इतिहासात घडलेल्या महत्वपूर्ण घडामोडी !

१७९१: रमाँट हे अमेरिकेचे १४ वे राज्य बनले.१८३६: शिकागो शहराची स्थापना झाली.१८६१: अमेरिकेच्या १६ व्या राष्ट्राध्यक्षपदी अब्राहम लिंकन यांची निवड झाली.१८८२: ब्रिटन मधील पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडन मध्ये सुरु.

१९३६: हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.१९५१: नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.१९६१: इंग्लंडमध्ये १९४६ साली बनवलेली विमानवाहू युद्धनौका भारतीय नौदलात आय. एन.एस. विक्रांत नावाने दाखल झाली.१९७४: पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.

१९८०: प्रचंड बहुमताने निवडणुका जिंकून रॉबर्ट मुगाबे हे झिम्बाब्वेचे पहिले कृष्ण्वर्णीय पंतप्रधान बनले.१९९६: चित्रकार रवी परांजपे यांना कॅग हॉल ऑफ फेम हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर.२००१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण केले.

४ मार्च जन्म,१८६८: चलत चित्रपटाचे प्रवर्तक हरीश्चंद सखाराम भाटवडेकर यांचा जन्म.१८९३: पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन यांचा जन्म. (मृत्यू: ४ मार्च १९८५),१९०६: फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे निर्माते एवेरी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १९९४),१९२२: गुजराथी आणि हिंदी चित्रपट अभिनेत्री विना पाठक यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर २००२)

१९२६: अॅमवे चे सहसंस्थापक रिचर्ड डेवोस यांचा जन्म.१९३५: कॉंग्रेसच्या नेत्या प्रभा राव यांचा जन्म.१९७३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक चंद्र शेखर येलेती यांचा जन्म.१९८०: भारतीय टेनिस खेळाडू रोहन बोपन्ना यांचा जन्म.१९८६: इन्स्टाग्राम चे सहसंस्थापक माईक क्रीगेर यांचा जन्म.

४ मार्च मृत्यू,१८५२: रशियन नाटककार आणि कथा कादंबरीकार निकोलय गोगोल यांचे निधन.१९१५: ब्रिटिश समर टाईम चे निर्माता विल्यम विल्लेत्त यांचे. (जन्म: १० ऑगस्ट १८५६),१९२५: रवीन्द्रनाथ टागोर यांचे मोठे भाऊ बंगाली साहित्यिक आणि चित्रकार ज्योतीन्द्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: ४ मे १८४९ – कोलकाता, पश्चिम बंगाल),१९४८: भारतीय राजकारणी आणि हिंदू महासभेचे संस्थापक बाळकृष्ण शिवारम मुंजे यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १८७२)

१९५२: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटीश जैवरसायन शास्रज्ञ सर चार्ल्स शेरिंग्टन यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८५७ – आयलिंग्टन, लंडन, इंग्लंड),१९७६: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वॉल्टर शॉटकी यांचे निधन. (जन्म: २३ जुलै १८८६),१९८५: साहित्यिक डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांचे निधन.

१९९२: सकाळ च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका शांताबाई परुळेकर यांचे निधन.१९९५: चरित्र अभिनेता इफ्तिखार (जन्म: २२ फेब्रुवारी १९२०),१९९६: नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांचे निधन.१९९७: अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ रॉबर्ट इह. डिक यांचे निधन.

१९९९: भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, एअर इंडियाचे पहिले कर्मचारी विठ्ठल गोविंद गाडगीळ यांचे निधन.२०००: स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य गीता मुखर्जी (जन्म: ८ जानेवारी १९२४)

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

न्यूज अँड व्युज

न्यूज अँड व्युज
वीस वर्षांपासून प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या माध्यमातून पत्रकारिता केल्यानंतर आता सोशल प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलो आहोत न्यूज अँड व्युज हे ऑनलाइन वेब पोर्टल .बातमी अन त्यामागील भूमिका यासोबतच देश,विदेश, गाव गाड्याच्या अपडेट बातम्या आणि थेट लाखो लोकांपर्यंत तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठीच एक तुमचं हक्काचं व्यासपीठ .

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

//updated on 06012022 disable right click