पुणे – खासदार राजीव सातव यांचे पुण्यात रविवारी पहाटे जहांगीर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग झाला होता. तसेच त्यांना सेकंडरी न्यूमोनिया आणि मल्टी ऑर्गन फेल्यूअर सिंड्रोम होता, अशी माहिती जहांगीर हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. सत्यजित गिल यांनी दिली. काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांना कोरोना झाल्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. […]
राजीव सातव यांचे निधन !
पुणे – काँग्रेसचे युवा नेतृत्व खा राजीव सातव यांचे उपचारा दरम्यान रविवारी सकाळी निधन झाले .गेल्या 26 दिवसापासून त्यांच्यावर जहाँगिर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते .सातव हे काँग्रेसमधील एक सज्जन,क्लिन इमेज आणि युवा नेतृत्व म्हणून परिचित होते . अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राजीव सातव यांनी गेल्या काही दिवसांआधीच करोनावर मात केली होती. […]