नवी दिल्ली- भारताचा धडाकेबाज माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवाग याने कु या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर देखील जोरदार ओपनिंग केली आहे .आपल्या विनोदी शैलीमुळे फॅन्सचा आवडता असणाऱ्या विरुने एक लाख फॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे . या बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर दाखल झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत सेहवागच्या खुमासदार, विनोदी कमेंट्स, गंमतीशीर टिप्पण्या यांनी अल्पावधीतच लोकांचे लक्ष वेधून घेतले. […]