News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beednews

  • बीडच्या लाचखोर पोलीस निरीक्षकाला बेड्या !

    बीड- शहरातील सम्राट चौक भागात राहणाऱ्या आणि धुळे येथे स्थानिक गुन्हे शाखेत नोकरीस असलेल्या पोलीस निरीक्षक दत्ता शिंदे यांच्यासह तिघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.शिंदे यांच्या घराची झडती घेतली असता करोडो रुपयांची मालमत्ता आढळून आली. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील 35 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, ते राजकीय व सामाजिक कार्यकर्ता आहेत. राजकीय सहकार्‍यांशी मतभेद झाल्याने त्यांच्याविरोधात…

  • बीड,माढा चा तिढा कायम !लंकेसह पाच उमेदवार जाहीर !!

    मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने पाच लोकसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. नगर मधून लंके,बारामती सुळे,शिरूर मधून कोल्हे यांना उमेदवारी दिली आहे, मात्र बीड ,माढा येथील उमेदवारी चा तिढा अद्याप कायम आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून लोकसभा निवडणुकींच्या पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पहिली यादी जाहीर केली…

  • अजित पवारांना धक्का,लंके यांचा राजीनामा !

    अहमदनगर- पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आ निलेश लंके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलेल्या लंके यांनी अहिल्यानगर अर्थात अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पवारांनी सांगितलं लोकसभा लढवावी लागेल, मी म्हणालो ठीक आहे. आता शरद पवारांचा मार्गदर्शनाखाली लोकसभा लढविणार असल्याचे निलेश लंके यांनी जाहीर…

  • कुख्यात डॉन मुख्तार अन्सारीचा जेलमध्ये मृत्यू !

    उत्तरप्रदेश- कुख्यात डॉन मुख्तार अन्सारी याचा जेलमध्ये हृदयविकार च्या तीव्र धक्याने मृत्यू झाला आहे. अन्सारी याच्यावर 65 पेक्षा अधिक गुन्हे दाखल होते.उत्तरप्रदेश मधील जेलमध्ये गेल्या काही दिवसांपासून तो होता.पहाटे त्याला हृदयविकार चा झटका आला,बांदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. बांदा मेडिकल कॉलेजकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं, ज्यात मुख्तार…

  • एकनाथ शिंदे यांच्यावतीने आठ उमेदवारांची घोषणा !

    मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी आठ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली,विशेष बाब म्हणजे कल्याण चे विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. यामध्ये राहुल शेवाळे, संजय मंडलीक, सदाशिव लोखंडे, प्रतापराव जाधव, हेमंत पाटील यांच्या नावांचा समावेश…

  • केजमध्ये पंकजा मुंडेंची गाडी अडवली !पोलिसांचा लाठीमार !!

    केज-लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केज तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली.यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.पोलीस संरक्षणात मुंडे यांची गाडी बाहेर काढून देण्यात आली. बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे या गेल्या आठवडा भरापासून प्रचाराला लागल्या आहेत.बुधवारी केज तालुक्यातील दौऱ्यावर असताना पावनधाम येथील अखंड हरिनाम सप्ताहाला उपस्थित राहण्यासाठी पंकजा…

  • ज्योती मेटे मैदानात !अपक्ष की महाविकास आघाडी,निर्णय दोन दिवसात !!

    बीड- शिवसंग्राम च्या प्रमुख तथा स्व विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा देत थेट बीड लोकसभा निवडणूक लढण्याचा इरादा पक्का केला आहे.येत्या दोन दिवसात अपक्ष लढायचं की महाविकास आघाडीकडून हे निश्चित केले जाईल अशी माहिती मेटे यांनी दिली. ज्योती मेटे यांनी मंगळवारी स्व विनायक मेटे यांच्या समाधीचे दर्शन घेत पत्रकार परिषदेत…

  • सोलापूर मधून राम सातपुते तर हिमाचल मधून कंगना !

    नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली पाचवी यादी जाहीर केली आहे,यामध्ये महाराष्ट्रातून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.सोलापूर मधून आ राम सातपुते यांना तर अभिनेत्री कंगना रनौत हिला हिमाचल मधील मंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे. कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता कॉन्ट्रावर्सी क्वीन कंगनाही…

  • बहिणीच्या स्वागताला भावाची लगबग !

    परळी- लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीच्या उमेदवार तथा माजीमंत्री पंकजा मुंडे या आपल्या बहिणीच्या अभूतपूर्व स्वागतासाठी भाऊ धनंजय मुंडे यांची लगबग दिसून आली.एक हजार किलोचा हार,चार राज्यातील स्वागत पथकं आणि जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण,हा नजारा होता परळी शहरात.पंकजा मुंडे या प्रथमच परळीत येत असल्याने धनंजय मुंडे यांच्या वतीने त्यांचे अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. भाजप नेत्या पंकजा…

  • बजरंग सोनवणे यांचा शरद पवार गटात प्रवेश !

    मुंबई- केज येथील येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माजी जी प उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला. बीड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनवणे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम केलेले आहे.कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे म्हणून सोनवणे परिचित होते. 2019…