मुंबई- राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील आठवड्यात होणार आहे.गृह,महसूल,अर्थ ही खाती भाजपकडे तर नगरविकास, बांधकाम,कृषी ही खाती शिंदे यांच्या शिवसेना गटाकडे राहतील अशी माहिती आहे. 12 किंवा 13 जुलै रोजी मंत्रिमंडळ विस्तार होईल.6 आमदारांमागे एक मंत्रिपद अशी रचना असेल अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेत आतापर्यंतची सर्वात […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जोरदार बॅटिंग !
मुंबई- राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठरावावर बोलताना शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार,शरद पवार ,उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करत जोरदार बॅटिंग केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी खंबीरपणे पाठीशी राहण्याचा शब्द दिला.तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी रात्री अपरात्री असलेल्या संपर्कामुळेच आपल्याला ही संधी मिळाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनमोकळ्या भाषणाने सभागृहातील […]
सेना भाजपचा शिंदे सरकारवर विश्वास !
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना भाजपसह अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांनी विश्वास दाखवला.तब्बल 166 पेक्षा अधिक मते मिळवत यापुढे शिंदे सरकार राज्यावर सत्ता गाजवेल हे आमदारांनी दाखवून दिले. राज्यातील सत्तानाट्य संपल्यानंतर रविवारी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीत सेना भाजपचे आ राहुल नार्वेकर हे विजयी झाले होते.तब्बल 164 मत नार्वेकर यांना मिळाली होती. दरम्यान सोमवारी मुख्यमंत्री […]
भाजपचे राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष !
मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे आ राहुल नार्वेकर यांची निवड झाली.महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा नार्वेकर यांनी पराभव केला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना भाजपचा हा पहिला मोठा विजय मानला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.त्यानंतर शिवसेना भाजपच्या या नव्या सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी […]
राहुल नार्वेकर होणार विधानसभा अध्यक्ष !
मुंबई- एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या राज्यातील सत्तानाट्याला पूर्णविराम लागला.भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे,त्यामुळे आता सासरे जावई दोन्ही सभागृहाचे अध्यक्ष सभापती असणार आहेत. राहुल नार्वेकर हे 45 वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष असतील. […]
पोलिटिकल सर्जिकल स्ट्राईक ……..!
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर जिथं सर्वसामान्य माणसांची बुद्धी किंवा वैचारिक पातळी संपते तिथून पुढं राजकारणी लोकांची सुरू होते अस म्हणतात याचा अनुभव गुरुवारी तमाम महाराष्ट्राने घेतला.अडीच वर्षे सरकारला सळो की पळो करून सोडणारे फडणवीस,माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,राजकारणातील तथाकथित भीष्माचार्य शरद पवार या सगळ्यांनाच भाजपच्या विशेषतः गृहमंत्री अमित शहा यांच्या एका निर्णयाने असा धक्का दिला […]
शनिवारी नव्या सरकारची बहुमत चाचणी !
मुंबई- राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारची बहुमत चाचणी शनिवारी होणार आहे.शनिवार अन रविवारी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन होईल,यामध्ये नव्या सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाला गुरुवारी पूर्णविराम मिळाला.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर या दोघांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. […]
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री !
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात शपथ घेतली.दुपारी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण कुठलेही पद घेणार नाही असे म्हटले होते मात्र दिल्लीतून सूत्र हलली आणि संध्याकाळी शिंदे यांच्यासोबत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आलेल्या भूकंपानंतर भाजपच्या […]
एकनाथ शिंदे होणार मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस !
मुंबई – राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे आज सायंकाळी साडेसात वाजता शपथ घेतील अशी माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. शिवसेनेच्या शिंदे यांना भाजप आणि अपक्ष साथ देतील अशी माहिती त्यांनी दिली.भाजपने हा निर्णय घेऊन सर्वानाच मोठा धक्का दिला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी […]
अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा !
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली.लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे राजीनामा देणार असल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने आज दुपारीच दिले होते,त्यांच्या राजीनाम्याने आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.त्याचसोबत […]