News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beedcivilhospital

  • शरद पवारांची 17 ऑगस्ट ला बीडमध्ये सभा !संदिप क्षीरसागर यांच्यावर जबाबदारी !!

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा महाराष्ट्र दौरा 17 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर पहिली सभा येवला येथे झाल्यानंतर पवारांची दुसरी सभा बीडला होणार आहे.या सभेचे नियोजन आणि जबाबदारी आ संदिप क्षीरसागर यांच्याकडे देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये 2 जुलै रोजी फूट पडल्यानंतर पुन्हा पक्ष बांधणीसाठी शरद पवार मैदानात उतरले…

  • महसूल सप्ताहात एकाच दिवसात 155 प्रकरणे निकाली !

    बीड- महसूल सप्ताहानिमित्त बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सचिन सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकाच दिवसात तब्बल 155 प्रकरणे निकाली काढली.महसूल प्रशासनाने एक हात मदतीचा हा उपक्रम राबविल्याने सर्वसामान्य लोकांमधून त्याचे कौतुक होत आहे. सामाजातील प्रत्येक घटकांच्या नागरिकांसाठी दि.1 ऑगस्ट ते दि.7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी…

  • बीड जिल्हा परिषदेला लागलेलं ग्रहण सुटलं !

    बीड- बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांची बदली झाली आहे.अविनाश पाठक हे नवे सीईओ असतील.गेल्या दोन वर्षांपासून बीड जिल्हा परिषदेला लागलेले ग्रहण यामुळे सुटलं आहे अशा प्रतिक्रिया लोकांमधून व्यक्त होत आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या विद्यमान सीईओ अजित पवार यांच्या कारभारावर अनेकांकडून टीका झाली होती.विशेषतः जल जीवन मिशन या योजनेत पवार यांनी मनमानी…

  • विद्यार्थ्यांच्या नावाखाली अधिकाऱ्यांची अमेरिकेला फॅमिली ट्रिप !

    अकरा विद्यार्थ्यांसाठी दहा बारा अधिकारी शासकीय खर्चाने सहकुटुंब करणार परदेश दौरा ! बीड- बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या शाळांमधून निवड झालेले अकरा विद्यार्थी थेट नासा ला भेट देणार आहेत.यापूर्वी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी इस्रो ची पाहणी केली होती.आता थेट अमेरिकेत जायची संधी मिळणार असल्याने या संधीचा फायदा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी देखील घ्यायचे ठरवले आहे.शासनाच्या पैशावर ज्यांचा विज्ञान किंवा शिक्षण…

  • तीस वर्षीय तरुणाचा खून !शहरात खळबळ !!

    बीड- शहरातील चराठा रोड भागात तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बीड शहरात 30 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक माहितीवरून पांडुरंग नारायण माने असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूलाच (MH-23 AM…

  • पीकविमा भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस !

    मुंबई – पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा…

  • कृषिमंत्री मुंडेंची सतर्कता ! शेतकऱ्यांची तक्रार येताच कंपनीचा परवाना निलंबित !!

    धुळे- शेतकऱ्यांना बोगस खत बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी बाबत थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना काही शेतकऱ्यांनी फोनवर तक्रार केली.याची तातडीने दखल घेत मुंडे यांनी थेट कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. धुळे जिल्ह्यमधील ग्रीनफिल्ड एग्रीकेम इंडस्ट्रीज (Greenfield Agrichem Industries) या खत तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती…

  • जलयुक्त शिवार घोटाळा,गुत्तेदार, मजूर संस्था काळ्या यादीत !

    बीड- जलयुक्त शिवार अभियान मध्ये लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या परळी,अंबाजोगाई सह जिल्ह्यातील दहा ते बारा गुत्तेदार अन मजूर संस्थांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.या संस्थांनी आणि गुत्तेदार यांनी चुकीचे पत्ते देऊन शासनाची दिशाभूल केली आहे.त्यामुळे त्यांना नोटीस पाठवणे कठीण जात आहे,अशा सर्व गुत्तेदार आणि मजूर संस्थांवर तातडीने कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक…

  • बोगस खत विकणाऱ्या नवभारत फर्टिलायझर विरुद्ध गुन्हा !

    माजलगाव- शासनाची परवानगी न घेता शेतक-यांना बोगस खत विक्री प्रकरणी तेलंगना राज्यातील हैद्राबाद येथील नवा भारत फर्टिलाझर्स कंपनीच्या संचालक मंडळासह वाशिम जिल्हयातील एका विक्रेत्याविरुध्द माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्हास्तरीय गुण नियंत्रण भरारी पथकास माजलगाव येथे बोगस खत विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन माजलगाव येथील बायपास रोडवरील…

  • विजय दर्डा यांना शिक्षा !

    नवी दिल्ली- कोळसा खाण वाटप घोटाळ्यात दोषी ठरलेले माजी खा विजय दर्डा आणि मुलगा करन दर्डा या दोघांना न्यायालयाने चार वर्षांनी शिक्षा सुनावली आहे.दर्डा यांना न्यायालयाने मोठा दणका दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजय दर्डा यांना दिल्लीच्या विशेष न्यायालयाने 4 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा तसेच यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक…