News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beedcity

  • वासनवाडी शिवारातील वादग्रस्त फेरफार रद्द !

    बीड- शहरातील वासनवाडी शिवारातील वादग्रस्त फेरफार रद्द करण्याचे आदेश देत उपविभागीय अधिकारी यांनी मंडळ अधिकारी सचिन सानप यांना दणका दिला आहे.या प्रकरणात ऍड दीपक कुलकर्णी यांनी गेल्या अनेक महिन्यापासून कायदेशीर लढा उभारला होता. वासनवाडी शिवारातील गट नं-१५० अ मधील फेरफार ३०५० फेरफार प्रकरणात मंडळअधिकारी सचिन सानप यांनी आपल्या पद व अधिकाराचा गैरवापर केला होता.याप्रकरणात अपिलार्थी…

  • 21 लाखांपेक्षा अधिक मतदार बजावणार हक्क !

    बीड -बीड जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी 21 लाख 15 हजार 813 इतके मतदार असून यामध्ये 11 लाख 20 हजार 529 पुरुष व 9 लाख 95 हजार 245 स्त्री मतदार तर 39 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यात मतदानासाठी निवडणूक विभागाकडून 2 हजार 355 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये शहरी भागात 441 व ग्रामीण भागात 1914…

  • बीडचे मतदान 13 मे रोजी होणार!

    नवी दिल्ली- देशभरातील लोकसभा निवडणुकीची घोषणा आयोगाने केली,ज्यामध्ये राज्यात पाच टप्यात निवडणूक होणार आहे.बीडचे मतदान  13 मे रोजी होणार आहे. 4 जूनला मतमोजणी होईल. निवडणूक आयोग अधिकारी राजीवकुमार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.देशात सात टप्यात आणि राज्यात 19 एप्रिल,26 एप्रिल,7 मे,13 मे आणि 20 मे रोजी मतदान होईल. महाराष्ट्रात मतदान कधी आणि…

  • लोकसभा निवडणुकीची घोषणा !

    4 जूनला होणार मतमोजणी ! महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान ! नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणूक 2024 सात टप्यात होईल.पहिला टप्पा 28 मार्च पासून सुरू होईल.19 एप्रिल ला मतदान होईल.तामिळनाडू,राजस्थान,छत्तीसगड, मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि बिहार.दुसरा टप्पा 28 मार्च ते 26 एप्रिल ला मतदान होईल. 12 एप्रिल ते 7 मे दरम्यान तिसरा टप्पा यात 12 राज्यात निवडणूक होईल.चौथा…

  • शेतकऱ्यांना कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ- मुख्यमंत्री !

    मुंबई – शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली. बीड जिल्ह्यातील किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ दूकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणारे आहे. डिजीटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान…

  • शनिवारी लागणार आचारसंहिता !

    नवी दिल्ली- केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्या दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद चे आयोजन केले आहे,यामध्ये आगामी 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीच्या तारखांची घोषणा केली जाणार आहे.त्यामुळे उद्या दुपारी चार वाजेपासून आचारसंहिता लागेल. देशात आगामी काळात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात असून, अखेर उद्या (दि.16)…

  • प्रीतम ला विस्थापित होऊ देणार नाही- पंकजा मुंडे !

    मुंबई- भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. यावेळी पंकजा यांनी आपल्या बहीणीचं तिकीट कापून आपल्याला उमेदवारी मिळाली असली तरी प्रीतम ताईला आपण विस्थापित करणार नाही, असं मोठं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. “माझी उमेदवारी जाहीर झाली ही गोष्ट माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक आहे. त्यामुळे माझ्या भावना आभाराच्या…

  • पंकजा मुंडे, रक्षा खडसे यांच्यासह राज्यातील वीस उमेदवार जाहीर !

    नवी दिल्ली -भारतीय जनता पक्षाने देशातील 72 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली.यामध्ये महाराष्ट्रातून वीस नावे जाहीर झाली आहेत.नागपूर मधून नितीन गडकरी,बीडमधून पंकजा मुंडे,पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. अखेर भाजपने बुधवारी संध्याकाळी महाराष्ट्रातील एकूण 20 उमेदवारांची  यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये मोदी-शाह यांनी काही ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला आहे. तर काही…

  • देशभरात साजरा होणार मराठवाडा मुक्ती संग्राम दिन !

    नवी दिल्ली- केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.हैदराबाद स्वतंत्र्य लढ्यातील शहीदांचे बलीदान लक्षात राहवे यासाठी हा दिवस देशभरात साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मराठवाड्यासाठी हा गौरवपूर्ण निर्णय असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. १७ सप्टेंबर १९४८ रोजी मराठवाडा निजामाच्या तावडीतुन मुक्त झाला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला. तो…

  • देशात सीएए लागू !

    नवी दिल्ली- केंद्र सरकारने सीएए कायद्याबाबत अधिसूचना जारी केली आहे.यामुळे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश मधील शरणार्थी नागरिकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. सीएए कायदा लागू झाल्यानंतर आता जे शरणार्थी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात दाखल झाले आहेत. त्यांना भारताचं नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामध्ये मुस्लिमांशिवाय हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी या धर्माच्या लोकांचा समावेश…