बीड- शहरातील पिंगळे तरफ चा तलाठी घोडके याच्या हाताखाली काम करणारा खाजगी व्यक्ती शेख खमर याने तीन हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला अटक केली.मात्र मूळ सूत्रधार लाचखोर तलाठी घोडके मात्र निसटला.ज्याच्यासाठी लाच मागितली त्याच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले […]
आरटीओ खरमाटे ची कोटींच्या कोटी उड्डाणे !
मुंबई – पगार लाख दीड लाख महिना अन संपत्ती मात्र शेकडो कोटींची ही कहाणी आहे परिवहन खात्यातील अधिकारी बजरंग खरमाटे यांची.आयकर विभागाने खरमाटे यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेवर छापे घातल्यानंतर मोठं घबाड हाती लागल आहे.या खरमाटे महाशयांचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी निटकचे संबंध असल्याचे समोर आले आहे.त्यामुळे परब हे देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. […]
सोमवार पासून शाळा कॉलेज बंद !
मुंबई – कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव लक्षात घेता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यासोबत हॉटेल,रेस्टॉरंट, बार,सलून मध्ये 50 टक्के उपस्थिती ठेवावी,लग्नात 50 तर अंत्यसंस्कार ला 20 लोकांची उपस्थिती, रात्री दहा ते सकाळी 7 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु लावण्यात येणार असल्याचे आदेश दिले आहेत.येत्या सोमवार पासून नवे निर्बंध लागू होतील. […]
लाखाची लाच घेतली,नायब तहसीलदार ताब्यात !
माजलगाव – मंडळ अधिकार्याची चौकशी करावी असा अर्ज देऊन त्यामध्ये पैशाची तडजोड करून ते स्वीकारत असताना शेतकरी संघटनेचा जिल्हाध्यक्ष अशोक नामदेवराव नरवडे व त्यांच्यासाठी मध्यस्थी करणार्या पुरवठा विभागाचा नायब तहसीलदार सैदुराम तुकाराम कुंभार (राजे) यांना शुक्रवारी (दि.31) लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने माजलगावात रंगेहाथ पकडले. शेतीरस्त्यासाठी येथील मंडलाधिकारी हे शेतकर्याला त्रास देत आहेत व […]
मार्ड चा उद्यापासून संपाचा ईशारा !
बीड – आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर जाणार आहेत.कोरोनाची तिसरी लाट दारात उभी असताना डॉक्टर मंडळींनी संपाच हत्यार उपसल्याने राज्य सरकार समोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र स्टेट असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्सने उद्या सकाळी 11 वाजल्यापासून संप सुरू करणार आहेत. जोपर्यंत नीट-पीजी काऊन्सिलिंग प्रक्रियेसंदर्भातली तारीख जाहीर होत नाही, तोपर्यंत संप सुरुच […]
जिल्ह्यात वापरलेल्या रेमडीसविर ची माहिती पोलिसांनी मागवली !
बीड- जिल्ह्यात मार्च ते जून 2021 या काळात किती रुग्णांना रेमडीसविर इंजेक्शन देण्यात आले.ते कोठून उपलब्ध केले गेले,कोणत्या डॉक्टर ने सांगितले होते यासह इतर माहिती तातडीने उपलब्ध करून देण्याचे फर्मान पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांना दिल्याने इंजेक्शन चा काळाबाजार करणाऱ्या एसीएस राठोड सह खाजगी डॉक्टर लोकांचे धाबे दणाणले आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाची दुसरी […]
राजेंद्र मस्के वगळता इतर आरोपींना जामीन !
बीड- स्वतःच्या मालकीच्या जागेत जुगार अड्डा चालू असल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेले भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या जामीनाबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.मस्के एकीकडे पत्रकार परिषद घेत असताना दुसरीकडे पोलीस मात्र तपास करण्यात गुंग आहेत.या प्रकरणातील इतर 47 आरोपींना जामीन झाला मात्र मस्के यांनी ना जामीन घेतला ना पोलिसांनी त्यांना अटक केली. बीड शहरानजीक असलेल्या […]
माजी गृहमंत्री देशमुख यांच्यासह मुलांविरुद्ध आरोपपत्र दाखल !
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह त्यांची दोन मुले ऋषिकेश आणि सलील या दोघांविरुद्ध सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) तब्बल सहा हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.या आरोपपत्रात देशमुख यांचे नाव 100 कोटीच्या वसुली प्रकरणात मुख्य आरोपी म्हणूंन नाव आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी बुधवारी मुंबई […]
लोकल पोलीस,एस पी च नेटवर्क करत काय ?
बीड – एकीकडे जिल्ह्यात मटका,गुटखा,वाळू,पत्याचे क्लब,अवैध दारू असे सगळे प्रकार सुरू आहेत तर दुसरीकडे पंकज कुमावत यांचं पथक गेल्या काही महिन्यांपासून या धंद्यावर कायद्याचा फास आवळत आहेत.हे धंदे जर एवढ्या बिनधास्तपणे जिल्ह्यात सुरू आहेत तर लोकलचे पोलीस आणि एसपी,डीवायएसपी यांचं नेटवर्क नेमकं करतंय काय?असा प्रश्न उपस्थित होत आहे.लोकल पासून ते शुगर पर्यंत सगळ्यांचेच या अवैध […]
नगराध्यक्ष क्षीरसागर यांच्या अपात्रतेबाबत राज्यमंत्र्यांकडे होणार सुनावणी !
बीड- बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या अपात्रतेबाबत ची सुनावणी आता नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे होणार आहे.औरंगाबाद खंडपीठाने डॉ क्षीरसागर यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निकाल दिल्याने त्यांना मोठा धक्का मानला जात आहे.आ संदिप क्षीरसागर यांनी त्यांच्या अपात्रतेबाबत तक्रार केल्याने काका विरुद्ध पुतण्या हा संघर्ष अधिक तीव्र होणार आहे. बीड विधानसभेचे आ. संदिप क्षीरसागर […]