News & View

ताज्या घडामोडी

Tag: #beed

  • बी एन्ड सी ने पैसे खाण्यासाठी उभारले गांडूळ खत शेड !

    बीड- अधिकाऱ्यांना चार पैसे खायला मिळणार असतील तर ते काय करतील याचा नेम नाही.बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात देखील असाच प्रकार उघडकीस आला आहे. बीड एन्ड सी च्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात चक्क गांडूळ खत निर्मिती प्रकल्पासाठी शेड उभारले,यावर लाखो रुपये खर्च केले मात्र प्रत्यक्षात प्रकल्प सुरूच झाला नाही. बीडच्या सार्वजनिक बांधकाम विभागात नेहमी काही ना काही…

  • गुटखा तस्कर आबा मुळे वर मोक्का लावण्याची गरज !

    बीड- परराज्यातून बीड जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचा गुटखा तस्करी करणाऱ्या आणि तब्बल बारा ते तेरा गुन्हे दाखल असलेल्या महारुद्र मुळे उर्फ आबा मुळे वर मोक्का अंतर्गत कारवाई होणे आवश्यक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गुटखा आणि 307 सारखे गंभीर गुन्हे दाखल असताना गुटखा तस्कर मुळे आबावर पोलीस एवढे का मेहरबान आहेत असा सवाल उपस्थित होत आहे. बीड…

  • आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुकर होईल. तुमचा विश्वास ज्या व्यक्तीवर आहे अशी व्यक्ती तुम्हाला पूर्ण सत्य सांगणार नाही -इतरांना पटवून देण्याच्या तुमच्या क्षमतेमुळे तुम्ही आगामी काळात उद्भवणा-या समस्या सोडवू शकाल. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. तुमच्या कामाला आज…

  • मल्टिस्टेट च्या कुटाण्यांमुळे प्लॉटिंग ला अच्छे दिन !

    बीड- लोकांनी मोठ्या विश्वासाने ठेवलेले पैसे आपले खाजगी उद्योग प्लॉटिंग जमिनी घेण्यासाठी तसेच कारखाने आणि उद्योगधंदे उभारण्यासाठी वापरायचे आणि मनी लॉन्ड्रींग करत संस्था बुडाल्या की फरार व्हायचे असा सगळा उद्योग बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या मल्टीस्टेट आणि पतसंस्था चालकांनी केला यामुळे हजारो कोटी रुपये ठेविधानांचे बुडाले मात्र आता ज्या पतसंस्था आणि मल्टीस्टेट सुरू आहेत त्यांच्यासमोरही ठेवी काढण्यासाठी…

  • बीडच्या सचिन धस ची भारतीय संघात निवड !

    नवी दिल्ली-भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अंडर-19 आशिया कप स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या उदय सहारनकडे या संघाची कमान सोपवण्यात आली आहे.यामध्ये बीडच्या सचिन संजय धस याची निवड झाली आहे.भारतीय संघात निवड झालेला सचिन हा बीड जिल्ह्यातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. दुबईच्या यजमानपदावर ही स्पर्धा खेळवली…

  • अंतरवली दगडफेक प्रकरणाचे गेवराई कनेक्शन !चौघांना अटक !

    जालना- अंतरवली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली होती. या दगडफेकीच्या घटनेतील आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.या दगडफेकीचे कनेक्शन थेट गेवराई पर्यंत पोहचले असून बेदरे सह चार जण पोलिसांनी अटक केले आहेत.आरोपीकडून पिस्तुल आणि काडतुसे जप्त करण्यात आली…

  • जाळपोळ,दगडफेक प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार !स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांच्या तपासावर संशय !!

    बीड- बीड शहरासह जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणात पोलिसांनी 250 पेक्षा अधिक आरोपीना अटक केली असली तरी अद्यापही गोरख शिंदे सारख्या म्होरक्यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलेले नाही.स्थानिक गुन्हे शाखेवर मोठी जबाबदारी असताना त्यांची दोन पथके अन पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांचा कारभार म्हणजे मला पहा अन फुल वहा असा झाला…

  • पतसंस्थेच्या पैशातून उभारलेला गूळ कारखाना अडचणीत ! शेतकरी हवालदिल !

    बीड- मुनीम,पिग्मी एजंट ते पतसंस्थेचा अन गूळ कारखान्याचा मालक हा साईनाथ परभने यांचा प्रवास थक्क करणारा आहे.ठेवीदारांनी विश्वासाने ठेवलेल्या पैशातून त्यांनी हिरापूर आणि गुळज या ठिकाणी गूळ कारखाने काढले मात्र त्या धंद्यात तोटा आल्याने पतसंस्था बंद करून ठेवीदारांच्या झोपेत धोंडा घालण्याचे काम त्यांचाकडुन झाले आहे.जो माणूस ठेवीदारांचे पैसे वेळेत देऊ शकत नाही तो आपल्या उसाचे…

  • कौमच्या पत्रकारांसोबत मिलियाच्या ट्रस्टीची बैठक !

    बीड- गेल्या चार पाच वर्षांपासून आपल्या संस्थेतील एका सेक्सरॅकेट मध्ये सहभागी असलेल्या शिक्षकाला पाठीशी घालणाऱ्या अन मीडियामध्ये बोंबाबोंब झाल्यानंतर जागे झालेल्या मिलिया च्या ट्रस्टीनी बुधवारी मुस्लिम समाजातील काही पत्रकारांसोबत सचिवांच्या घरी बैठक घेतली.कौम का मामला है,हमे मदत करो अस म्हणत उपस्थित पत्रकारांना आपली बाजू कशी बरोबर आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. बीड शहरातील…

  • लोकांच्या ठेवी कधी अन किती द्यायच्या याचा अधिकार पतसंस्था चालकांना कोणी दिला !

    बीड- सर्वसामान्य ठेवीदारांनी मोठ्या मेहनतीने कमावलेला पैसा जर एखाद्या मल्टिस्टेट किंवा पतसंस्थेत ठेवला तर तो कधी काढायचा अन कधी नाही याचा सर्वस्वी अधिकार त्याचा आहे.त्याला गरज लागेल तेव्हा तो हवे तेव्हढे पैसे काढू शकतो,त्याला सर्व्हिस देणं हे त्या संस्थेचे कर्तव्य आहे.मात्र गेवराईच्या काही पतसंस्था मालकांनी यापुढे एका ठेवीदाराला दररोज प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय…