News & View

ताज्या घडामोडी

Tag: #सुरेश धस

  • पदोन्नती होऊनही आनेराव ग्रामीण पाणी पुरवठा सोडायला तयार नाही ! माल मिळत असल्याने सीईओ मूग गिळून गप्प !!

    बीड- पदोन्नती झाल्यानंतर कोणताही अधिकारी, कर्मचारी खुश होऊन त्या पदावर तातडीने रुजू होतो,मात्र बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वडवणीला नियुक्ती असताना बीड कार्यालयात कारभार पाहणारे व्ही डी आनेराव या कर्मचाऱ्याला खुर्चीचा मोह सुटत नाहीये.शिक्षण विभागात पदोन्नती झाल्यानंतर देखील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात प्रतिनियुक्तीवर स्वतःची ऑर्डर याने काढून घेतली आहे.कारण ग्रामीण पाणी पुरवठा विभागात…

  • वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द !न्यूज अँड व्युज चा दणका !!

    बीड- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी दाखवून शासनाला चुना लावणाऱ्या स्टोर किपर अजिनाथ मुंडे याची बीड जिल्हा रुग्णालयात झालेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. न्यूज अँड व्युजने याबाबत वृत्त दिल्यानंतर त्याची दखल घेत ही बदली रद्द करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात स्टोर किपर असलेल्या अजिनाथ मुंडे याने डॉ जयश्री बांगर,गणेश…

  • ऑन ड्युटी अटॅक, पोलिसाचा मृत्यू !

    बीड- कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला अन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. युवराज राऊत असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि मूळचे नाळवंडी येथील रहिवासी पोलीस कर्मचारी युवराज राऊत हे सकाळी पाटोदा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.त्यावेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने बीडला…

  • कांदाचाळीसाठी मनरेगातून मिळणार मदत !

    बीड- महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत आता कांदाचाळ चा देखील समावेश करण्यात आला आहे. कांदाचाळ उभारणीच्या कामासाठी लागणारा किमान एक लाख 60 हजाराचा खर्च मनरेगा मधून दिला जाणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन रोहयो विभागाने केले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड, वृक्ष लागवड…

  • दिव्यांग शिक्षकांची जे जे मध्ये होणार तपासणी !

    बीड- जिल्हा परिषदेच्या बदल्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडणाऱ्या तब्बल 41 शिक्षकांना 31मे पर्यंत मुंबईच्या जे जे रुग्णालयात हजर राहून तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.शिक्षकांनी हा अहवाल वेळेत न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलाच्या वेळी तब्बल 300 पेक्षा जास्त शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र…

  • देवस्थान जमीन घोटाळ्यात फडणवीस यांच्याकडून आ धस यांची पाठराखण !

    बीड- देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी आ सुरेश धस यांना वाचवण्यासाठी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महासंचालक प्रयत्न करत असल्याचा आरोप फिर्यादी राम खाडे यांनी केला आहे.खाडे यांनी अप्पर मुख्य सचिवांकडे केलेल्या तक्रारीत हे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हिंदू देवस्थानच्या जमिनी भूखंड माफियांनी गिळंकृत करत कोट्यावधींचा घोटाळा केल्याची…

  • वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला !

    बीड- कोरोना काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी करून शासनाला चुना लावणारा स्टोर किपर अजिनाथ मुंडे हा पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू होण्यासाठी आला आहे.प्राप्त माहितीनुसार सीएस डॉ साबळे यांनी त्याच्याकडे स्टोर चा चार्ज देण्यास नकार दिला आहे.मात्र मुंडे यांनी थेट सीएम आणि आरोग्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावली आहे.रुग्णाच्या जीवाशी खेळत कोट्यवधी…

  • महाप्रबोधन यात्रेपूर्वी शिवसैनिक आपसात भिडले !जिल्हाप्रमुख जाधव यांची गाडी फोडली !!

    बीड- खा संजय राऊत आणि उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेच्या समारोप स्थळी शिवसैनिक आपसातच भिडल्याची घटना बीडमध्ये घडली.उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यात मारामारी झाली.वरेकर यांनी यावेळी जाधव यांची गाडी फोडली.हा सगळा प्रकार घडला त्यावेळी उपनेत्या अंधारे या देखील समोर होत्या हे विशेष. शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा समारोप बीडमध्ये 20 मे रोजी होणार…

  • जिल्ह्यातील लाखभर लोकांना मिळणार रोख पैसे ! तुम्ही केलाय का अर्ज !!

    बीड- केशरी कुपन धारकांना यापुढे रेशन ऐवजी रोखीने पैसे मिळणार आहेत.राज्य शासनाने जानेवारी2023 पासून ही योजना लागू केली आहे मात्र त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.त्यानुसार बीड जिल्ह्यात केशरी कुपन धारक लाभार्थ्यांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे.त्यांच्याकडून अर्ज भरून घेणे सुरू आहे,जसजसे अर्ज येतील तसतसा या योजनेचा लाभ थेट त्या लाभार्थ्यांना दिला जाईल अशी माहिती…

  • कृषी अधीक्षक जेजुरकर रजेवर !

    बीड- विधानपरिषद आ सुरेश धस यांच्याशी झालेल्या वादानंतर जिल्हा कृषी अधीक्षक जेजुरकर हे अचानक रजेवर गेले आहेत.धस यांच्यासोबत आलेल्या काही लोकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता जेजुरकर हे रजेवर गेल्याने या वादाला अधिक तोंड फुटले आहे. पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागातील कर्मचारी जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा…