News & View

ताज्या घडामोडी

Tag: #शालेय शिक्षण

  • सेवानिवृत्त शिक्षकाला पुन्हा सेवेत घेणे अंगलट आले !शिक्षण विभागातील दोघांवर कारवाई !!

    बीड- पक्षाघातामुळे आजारी असलेल्या अन मेडिकल बोर्डाने अनफिट केलेल्या शिक्षकाला परत सेवेत घेण्याचा कुटाना शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.कनिष्ठ लिपिक गोसावी यांना निलंबित तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी नायगावकर यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिले आहेत.यामध्ये शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी देखील डोळेझाक केल्याने सीईओ पवार…

  • जिल्ह्यातील 76 मास्तरांचे टीईटी प्रमाणपत्र रद्द !

    बीड (प्रतिनिधी) – राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील 2018-19 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या 76 उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली असुन त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा सन 2018-19 मधील प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने दि.20 जुन 2023 रोजी…

  • आंतर जिल्हा बदलीवर बंदी ! जिथे नियुक्ती त्याच जिल्ह्यात निवृत्ती !!

    बीड- यापुढे नव्याने शिक्षक भरती झाल्यास या शिक्षकांना आंतर जिल्हा बदलीचा लाभ घेता येणार नाही.शासनाने काढलेल्या आदेशात याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.त्यानुसार आंतर जिल्हा बदली हवी असल्यास आहे त्या ठिकाणच्या नोकरीचा राजीनामा देऊन नव्याने भरती प्रक्रिया पार करून हव्या त्या जिल्ह्यात नियुक्ती मिळवता येईल.शासनाच्या या आदेशामुळे शिक्षकांच्या अडचणी वाढणार आहेत. राज्यात शासनाने विहीत केलेल्या कार्यपद्धतीनुसार…

  • जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थी आधार विना !

    बीड- बीड जिल्ह्यातील तब्बल 66 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अद्यापही सरळ पोर्टलवर जोडले गेलेले नाहीत.पाच लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट झाले आहेत मात्र ज्यांचे आधार कार्ड अपडेट झाले नाहीत त्या शाळांना दोन दिवसात अपडेट बाबत सूचित करावे अन्यथा त्या शाळांचे यु डायस नंबर रद्द करण्यात येतील असा इशारा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी दिला आहे….

  • महाविकास आघाडीचा बीडमध्ये मुकमोर्चा !

    बीड- शिवसेना नेते खा.संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी बीडमध्ये महाविकस आघाडी आज एकवटली. संतप्त महाविकास आघाडीच्या पदाधिकर्‍यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चाचे आयोजन करून मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी महाविकास आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी आपला संताप व्यक्त करत धमक्या प्रकरणी सरकारचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे…

  • वह्या पुस्तकांच्या किंमतीमुळे पालकांचे बजेट कोलमडले !

    बीड- शाळा सुरू व्हायला आठवडा शिल्लक असताना बाजारात वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येत आहे.मात्र यंदा 10 ते 40 टक्के किंमत वाढल्याने पालकांचे बजेट कोलमडून पडले आहे हे नक्की. जागतिक बाजारपेठेत कागदाच्या वाढलेल्या किमतीची झळ शालेय शिक्षणातील पाठ्यपुस्तके व वह्यांना बसली आहे. सध्या बाजारात दहावी-बारावीची नवी पाठ्यपुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गेल्या…

  • राज्यातील 30 शिक्षकांनाधिकाऱ्यांची विभागीय चौकशी ! शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित !!

    बीड- राज्यातील सर्वच शिक्षणाधिकारी यांची एसीबी चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवून खळबळ उडवून देणाऱ्या शिक्षण संचालक यांनी आता राज्यातील 30 शिक्षणाधिकारी यांची विभागीय चौकशी करून वेतनवाढ रोखण्याची कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात घबराट निर्माण झाली आहे. शिक्षक आणि कर्मचारी यांच्या भविष्य निर्वाह निधी ची रक्कम इतरत्र वापरून शासनाची फसवणूक करणाऱ्या तब्बल…

  • पदोन्नती होऊनही आनेराव ग्रामीण पाणी पुरवठा सोडायला तयार नाही ! माल मिळत असल्याने सीईओ मूग गिळून गप्प !!

    बीड- पदोन्नती झाल्यानंतर कोणताही अधिकारी, कर्मचारी खुश होऊन त्या पदावर तातडीने रुजू होतो,मात्र बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वडवणीला नियुक्ती असताना बीड कार्यालयात कारभार पाहणारे व्ही डी आनेराव या कर्मचाऱ्याला खुर्चीचा मोह सुटत नाहीये.शिक्षण विभागात पदोन्नती झाल्यानंतर देखील ग्रामीण पाणी पुरवठा विभागात प्रतिनियुक्तीवर स्वतःची ऑर्डर याने काढून घेतली आहे.कारण ग्रामीण पाणी पुरवठा विभागात…

  • राज्यात एकच गणवेश मात्र रंगाबाबत संभ्रम कायम !

    बीड- राज्यातील विद्यार्थ्यांना एकच गणवेश असेल अशी घोषणा सरकारने केल्यानंतर शालेय समिती कामाला लागली आहे.शाळा सुरू व्हायला अवघे आठ दहा दिवस शिल्लक असताना ड्रेस नेमका कोणत्या रंगाचा घ्यायचा याबाबत संभ्रम कायम आहे.त्यामुळे शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेष मिळणार की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. समग्र शिक्षा अंतर्गत वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन 2023-24…

  • अंशतः अनुदानित शाळेवरील शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न सुटणार !

    बीड- अंशतः अनुदानित शाळांमधील अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे त्याच शाळेवर समायोजन करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाने सरकारकडे पाठवला आहे.लवकरच त्याला मंजुरी मिळाल्यास या शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ‘आरटीई’च्या निकषांनुसार प्रत्येकी ३० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक, असे समिकरण आहे. तरीपण सद्य:स्थितीत राज्यातील ८९ हजार शाळांमध्ये ६७ हजारांहून अधिक शिक्षकांची पदे रिक्त आहेत. दरम्यान, पूर्वीच्या शासन निर्णयानुसार १०० टक्के…