News & View

ताज्या घडामोडी

Tag: #लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बीड

  • लाचखोर तलाठी जेरबंद !

    बीड- सातबारावर मालकी हक्कात नोंद घेण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच घेताना दिलीप कण्हेरकर या तलाठ्यास आणि त्याच्या सहकाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. बीड तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील तलाठी दिलीप कण्हेरकर आणि त्याचा सहकारी दिगंबर गात या दोघांनी तक्रारदार यांच्याकडे सातबारावर मालकी हक्कात नोंद करण्यासाठी सतरा हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत बीडच्या लाच लुचपत…

  • लिपिकाने मागितली साहेबांना लाच !

    बीड- कार्यकारी अभियंता पदावर असलेल्या आपल्याच साहेबांचे पगार बिल काढण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागणाऱ्या लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. छत्रपती संभाजी नगर येथील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना या कार्यालयात नोकरीस असलेले कार्यकारी अभियंता यांच्याकडे जून ते ऑक्टोबर 2023 या पाच महिन्याचे पगार बिल काढण्यासाठी प्रत्येक महिन्याचे दोन हजार याप्रमाणे दहा हजार…

  • लाचखोर उपजिल्हाधिकारी ताब्यात !

    बीड- तलावात गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागून पाच हजार रुपये घेताना बीडच्या उपजिल्हाधिकारी भारती सागरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.निवृत्त मंडळ अधिकारी सरवदे यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सलग दुसऱ्या दिवशी महसूल विभागाच्या लाचखोरांवर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील तलावाच्या बुडीत क्षेत्रात गेलेल्या घराचा पाच लाख…

  • ठेवीदार अन गडाच्या पैशातून उभारले कारखाने ! मल्टिस्टेट च्या व्यवहारावर संशय !!

    बीड- बीड जिल्ह्यातील अनेक मल्टिस्टेट अन पतसंस्था अचानक बंद होऊ लागल्या आहेत,त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब ठेवीदार मात्र भिकेला लागत आहेत.जिजाऊ माँ साहेब, ज्ञानराधा नंतर मंगळवारी साईराम अर्बन बंद झाल्याने खळबळ उडाली आहे. दुसरीकडे बीड तालुक्यातील आणखी एक मल्टिस्टेट बंद होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या मल्टिस्टेट मध्ये बीड जिल्ह्यातील काही गडाचे कोट्यवधी रुपये आहेत,हे पैसे या…

  • पीएसआय सह दोघे लाचखोर जाळ्यात !

    बीड- शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पीएसआय लक्ष्मण कीर्तने सह कर्मचारी रणजित पवार या दोघांना 28 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात यापूर्वी देखील दोन कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत.मंगळवारी सायंकाळी पीएसआय लक्ष्मण कीर्तने आणि शिपाई रणजित पवार या दोघांनी एका प्रकरणात 28 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे…

  • भूमिअभिलेख कार्यालयात लाचखोर जाळ्यात !

    अंबाजोगाई- एक हजार रुपयांची लाच घेताना येथील भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडण्यात आले.आठवडाभरात एसीबी ची लाचखोराविरुद्ध ही तिसरी कारवाई आहे. तक्रारदार यांनी त्यांची बर्दापुर येथील शेतजमीन गट क्र. 532, 533 ची कायदेशीर फिस भरुन मोजनी करुन घेतली होती . सदर मोजनीचे हद्द कायम नकाशे व इतर संबधीत कागदपत्रे भुमी अभिलेख कार्यालय येथुन प्राप्त करण्यासाठी तक्रारदार…

  • दहा हजाराची लाच घेताना पोलीस कर्मचाऱ्याला अटक !

    बीड- अदखलपात्र गुन्हा तातडीने निकाली काढण्यासाठी दहा हजाराची लाच घेताना वडवणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी रेवणनाथ गंगावणे यास पथकाने रंगेहाथ पकडले. शेजाऱ्यासोबत असलेल्या जमिनीच्या वादातून वडवणी पोलिसात काही दिवसांपूर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात वारंवार पोलिसांकडून त्रास दिला जात होता.तसेच पैशाची देखील मागणी केली जात होती. तब्बल पन्नास हजार रुपये या प्रकरणी नाव काढण्यासाठी…

  • जिल्हा बँकेत लाचखोराला अटक !

    बीड-लेखा परीक्षणाच्या धनादेशाची मंजुरी घेण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागणाऱ्या शाखा व्यवस्थापकाच्या नातेवाईकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.ही कारवाई बीडच्या जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेत घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रथमेश उर्फ बाळू ठोंबरे असे लाच घेणाऱ्या आरोपीचे नाव आहे.त्याचे काका हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखेत व्यवस्थापक आहेत.माजलगाव तालुक्यातील खेर्डा येथील सेवा…

  • पाटोदा नगरपंचायत मध्ये 20 लाखाचे गौडबंगाल !

    पाटोदा- नगरपंचायत स्थापना झाल्यानंतर तब्बल एक वर्ष पूर्वीच्या ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा व स्वच्छता समिती बँक खाते हस्तांतरित केले आहे.या दरम्यानच्या काळात बेकायदेशीरपणे २० लक्ष ४० हजार रुपये कोणी आणि कशासाठी उचलले याचे गोडबंगाल कायम आहे.यामध्ये मोठ्या प्रमाणावर अपहाराची दाट शक्यता असून सदरील प्रकरणी शिवभूषण लक्ष्मणराव जाधव, अबलूक घुगे व शेख मोबीन यांनी सचिव नगर विकास, सचिव…