News & View

ताज्या घडामोडी

Tag: #परळी

  • बोअरवेल मशिनवरील दोन कामगारांचा मृत्यू !

    परळी- गावात बोअर घेऊन परत निघालेल्या मशीन मधील लोखंडी पाईप चा स्पर्श विद्युत ताराना झाल्याने शॉक लागून दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना परळी तालुक्यातील वाघबेट या गावात घडली. वाघबेट येथे बोअर घेण्यासाठी मशीन मागविण्यात आले होते. काम संपल्यानंतर ही मशीन घेऊन चालक आणि कामगार परत निघाले.गावातून जाणाऱ्या 11 केव्ही विद्युत भारवाहक ताराना या…

  • तांत्रिक मान्यता,प्रशासकीय मान्यता एकाला अन कार्यरंभ आदेश दुसऱ्याला !

    बीड जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा खेळ उघडकीस ! बीड- पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जवळपास पन्नास लाखांच्या कामांमध्ये अधिकाऱ्यांनी मोठा घोळ घालून ठेवल्याचे उघडकीस आले आहे. तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता एका एजन्सीला दिल्यानंतर कार्यरंभ आदेश मात्र दुसऱ्याच एजन्सीला देण्याचा प्रकार समोर आला आहे.बांधकाम विभाग आणि इतर अधिकाऱ्यांनी चक्क चिरीमिरी साठी एजन्सी बदलल्याचे समोर…

  • मागासवर्गीय आयोगाकडून ब्राम्हण समाजाची दिशाभूल- धर्माधिकारी !

    परळी- राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात खुल्या प्रवर्गातील जातींचेही सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र हे सर्वेक्षण करताना ब्राह्मण जातीच्या नोंदी करत असताना विनाकारण ब्राह्मणांची नसलेली वर्गवारी करण्याचे पर्याय देण्यात आले आहेत. हा एक प्रकारे ब्राह्मण जातीला विखुरण्याचा डाव असून शासनाने ब्राह्मण समाजाला संभ्रमित करू नये. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणातील ही चुकीचे पर्याय काढून…

  • वैद्यनाथ नगरी राममय जाहली !

    परळी- संपूर्ण देशभरात रामाच्या स्वागतासाठी रामभक्त उत्साहात सज्ज झाले आहेत.प्रभू वैद्यनाथाच्या पावन भूमीत म्हणजेच परळी शहरात हजारो रामभक्तांनी राम नामाचा गजर करत भव्यदिव्य शोभायात्रा काढली.पालकमंत्री धनंजय मुंडे, माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह हजारो महिला,पुरुष रामाच्या जयघोषात तल्लीन झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. कलियुगातील तब्बल साडे पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येत मूर्त स्वरूपात विराजमान होत आहेत….

  • धनंजय माझ्याइतकाच देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा – अजित पवार !

    परळी- धनंजय मुंडे हा माझा सहकारी जेवढा माझ्या जवळचा आहे तेवढाच तो देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा जवळचा आहे अस म्हणत बीड जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले . परळी येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात ते बोलत होते.देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकास सुरू आहे.देशाला…

  • माझीच नजर न लागो माझ्या या वैभवाला – धनंजय मुंडे !

    परळी- आज परळी वैद्यनाथाच्या नगरीत शासन आलंय. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सगळे आलेत,व्यासपीठावर असलेले लोक पाहिल्यावर एकच वाक्य तोंडातून निघत ते म्हणजे माझीच नजर न लागो माझ्या या वैभवाला अस म्हणत राज्याचे कृषिमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना संबोधित केले. परळी येथे आयोजित शासन आपल्या दारी या…

  • परळीत मर्डर ! कायदा सुव्यवस्था धाब्यावर !!

    परळी- राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी शहरात दिवसाढवळ्या खुनाच्या घटना घडू लागल्या आहेत.चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मारहाणीची घटना ताजी असतानाच पहाटे महादेव मुंडे या व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे गुन्हेगारांवर नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे. परळी तालुक्यातील भोपळा या गावचे रहिवासी असलेले महादेव मुंडे यांचा…

  • परळीत सिनेतारका अवतरणार !

    परळी – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ‘नाथ प्रतिष्ठाण’ या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून तसेच ज्येष्ठ नेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरातील विद्यानगर भागात नाथ प्रतिष्ठाण आयोजित भव्य दांडिया महोत्सव महिलांसाठी सुरू असून शुक्रवारपासून या कार्यक्रमात आणखीनच रंगत येणार आहे! शुक्रवारपासून या कार्यक्रमात सौ.राजश्रीताई धनंजय मुंडे यांची विशेष उपस्थिती असणार असून…

  • पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई !

    बीड- परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने जप्तीची कारवाई केली आहे.19 कोटी रुपयांचे साहित्य या विभागाने पोलीस बंदोबस्तात जप्त केले.भाजप नेत्या पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्यावर कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने नोटिसा बजावल्या होत्या….

  • कृषी महाविद्यालयाच्या जागेची मुंडेंनी केली पाहणी !

    परळी -मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील कृषी महाविद्यालय आणि संशोधन केंद्राच्या जागेची पाहणी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी केली.केवळ घोषणा करून मुंडे थांबले नाहीत तर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून तातडीने याबाबतचे आराखडे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.परळी तालुक्यात तब्बल 314 कोटी रुपयांचे हे तीन प्रकल्प लवकरच सुरू होतील असा विश्वास त्यांनी यावेळी…