News & View

ताज्या घडामोडी

Tag: #डॉ सुरेश साबळे

  • वादग्रस्त भरती रद्द ! आरोग्यमंत्री सावंत यांचा निर्णय !!

    बीड- ज्या भरती प्रक्रियेवरून बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांचे निलंबन झाले ती भरती प्रक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्थगित केली आहे.त्यामुळे पैसे देणाऱ्यांनी आता पुढाऱ्यांच्या घरी चकरा मारणे सुरू केले आहे. बीडच्या लोखंडी सावरगाव या ठिकाणच्या रुग्णालयात आरोग्य भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या भरतीचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलं…

  • ठाकर,रियाज,एजाज यांची जिल्ह्याबाहेर बदली !

    बीड- जिल्हा रुग्णालयात कोरोना काळापासून स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या नावावर बोगस फार्म दाखवून कोट्यवधी रुपयांचे साहित्य अन औषध खरेदी करत भ्रष्टाचार करणारे तानाजी ठाकर,रियाज शेख आणि एजाज शेख यांनी जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयामध्ये कोणतेही जिल्हा शिल्लक चिकित्सक असले तरी स्टोअर सांभाळण्याची जबाबदारी औषध निर्माण अधिकारी आदिनाथ मुंडे तानाजी ठाकर रियाज शेख आणि एजाज…

  • कोरोना काळात निलंबित झालेल्या डॉ चव्हाण यांच्याकडे बीडचा पदभार !

    बीड- जळगाव येथे जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असताना कोरोना काळात साहित्य खरेदी प्रकरणी निलंबित झालेल्या डॉ नागेश चव्हाण यांच्याकडे बीडच्या शल्य चिकित्सक पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या अधिकाऱ्यावर जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हा प्रकार म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक…

  • साबळे सस्पेंड पण भरती झालेल्यांवर कारवाई कधी ?

    बीड- ज्या ब्लॅकलिस्ट कंपनीमार्फत लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात भरती केल्याचे प्रकरण गाजले अन त्यात डॉ सुरेश साबळे यांच्यासारख्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात 73 कर्मचाऱ्यांची भरती केली.ही भरती करण्याची प्रक्रिया…

  • रुग्णांकडून वसुली भोवली !एक निलंबित !

    बीड- जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून हप्ता वसुली केल्याप्रमाणे पैसे घेणाऱ्या जोहराबी शेख या कर्मचारी महिलेला निलंबित करण्यात आले आहे तर कौशल्या काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात असल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी चौकशी केली.चौकशी अहवालात…

  • आता टीसी मुळे प्रवेश अडणार नाही !

    बीड- एखाद्या विद्यार्थ्यांकडे शाळा सोडल्याचा दाखला अर्थात टीसी नसेल तर त्याला नव्या शाळेत प्रवेशास अडचणी येत असत,मात्र राज्य शासनाने ही अडचण दूर केली आहे.आता टीसी नाही म्हणून कोणत्याही विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारला जाणार नाहीये,असे झाल्यास संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर कारवाई होईल असा इशारा दिला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या राज्यभरात ४८ लाखांपर्यंत आहे. कोरोनाच्या…

  • वादग्रस्त मुंडेंची बदली रद्द !न्यूज अँड व्युज चा दणका !!

    बीड- कोरोनाच्या काळात कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी दाखवून शासनाला चुना लावणाऱ्या स्टोर किपर अजिनाथ मुंडे याची बीड जिल्हा रुग्णालयात झालेली बदली तडकाफडकी रद्द करण्यात आली आहे. न्यूज अँड व्युजने याबाबत वृत्त दिल्यानंतर त्याची दखल घेत ही बदली रद्द करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाच्या काळात स्टोर किपर असलेल्या अजिनाथ मुंडे याने डॉ जयश्री बांगर,गणेश…

  • वादग्रस्त मुंडे पुन्हा बीड सिव्हिल हॉस्पिटलला !

    बीड- कोरोना काळात डॉ जयश्री बांगर,गणेश बांगर यांच्यासोबत कोट्यवधी रुपयांची बोगस खरेदी करून शासनाला चुना लावणारा स्टोर किपर अजिनाथ मुंडे हा पुन्हा बीड जिल्हा रुग्णालयात रुजू होण्यासाठी आला आहे.प्राप्त माहितीनुसार सीएस डॉ साबळे यांनी त्याच्याकडे स्टोर चा चार्ज देण्यास नकार दिला आहे.मात्र मुंडे यांनी थेट सीएम आणि आरोग्य मंत्र्यांकडे फिल्डिंग लावली आहे.रुग्णाच्या जीवाशी खेळत कोट्यवधी…