News & View

ताज्या घडामोडी

Tag: #जिल्हा परिषद बीड

  • महसूल सप्ताहात एकाच दिवसात 155 प्रकरणे निकाली !

    बीड- महसूल सप्ताहानिमित्त बीडचे तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सचिन सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकाच दिवसात तब्बल 155 प्रकरणे निकाली काढली.महसूल प्रशासनाने एक हात मदतीचा हा उपक्रम राबविल्याने सर्वसामान्य लोकांमधून त्याचे कौतुक होत आहे. सामाजातील प्रत्येक घटकांच्या नागरिकांसाठी दि.1 ऑगस्ट ते दि.7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह राबविण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी…

  • पीकविमा भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस !

    मुंबई – पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा…

  • कृषिमंत्री मुंडेंची सतर्कता ! शेतकऱ्यांची तक्रार येताच कंपनीचा परवाना निलंबित !!

    धुळे- शेतकऱ्यांना बोगस खत बी बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी बाबत थेट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना काही शेतकऱ्यांनी फोनवर तक्रार केली.याची तातडीने दखल घेत मुंडे यांनी थेट कंपनीचा परवाना निलंबित केला आहे. धुळे जिल्ह्यमधील ग्रीनफिल्ड एग्रीकेम इंडस्ट्रीज (Greenfield Agrichem Industries) या खत तयार करणाऱ्या कंपनीवर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट करत माहिती…

  • मंडळ अधिकारी सचिन सानप चा अडेलतट्टूपणा !

    बीड- बीड महसूल मंडळाचे मांसल अधिकारी सचिन सानप हे सर्वसामान्य जनतेला जाणीवपूर्वक त्रास देऊन कामात अडेलतट्टू पणा करत आहेत.त्यांची खातेनिहाय चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ऍड दीपक कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. बीडचे मंडळ अधिकारी सचिन सानप हे कोणताही फेर मंजुरी साठी आल्यानंतर जाणीवपूर्वक त्रास देतात.वकील असो की आशील या दोघांना वारंवार घेटे…

  • शेतकऱ्यांना अडवाल तर आडवं करू- जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांचा ईशारा !

    बीड- तालुक्यातील शेतकऱ्यांना पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जातो.याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी शेकडो शिवसैनिक आणि शेतकऱ्यांसह पंचायत समिती कार्यालय गाठले.एकही शेतकऱ्यांची अडवणूक झाली तर अधिकाऱ्यांना शिवसेना स्टाईल ने सरळ करू असा इशारा यावेळी जगताप यांनी दिला. गेल्या काही दिवसांपासून बीड तालुक्यातील पंचायत समितीचे अधिकारी तथा…

  • आ संदिप क्षीरसागर यांचे जल्लोषात स्वागत !

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर बीडचे आ संदिप क्षीरसागर यांचे बीडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आ क्षीरसागर यांनी बीडमध्ये प्रवेश केला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.त्यानंतर बाईक रॅलीने बीड शहरातील वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. आ.संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर शनिवार (दि.२२) रोजी…

  • तुकाराम मुंढे यांची कृषी,पशुसंवर्धन विभागात बदली !41 अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या!!

    मुंबई- राज्यातील तब्बल 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या करण्यात आल्या आहेत.महिनाभरापूर्वी मराठी भाषा विभागात बदली झालेले तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि पशुसंवर्धन विभागात बदली करण्यात आली आहे. बीडचे माजी सीईओ अजित कुंभार हे अकोल्याचे जिल्हाधिकारी असतील. 1. राजेंद्र शंकर क्षीरसागर – मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर मुंबई म्हणून नियुक्ती…

  • पतसंस्थेच्या व्यवहारात ज्ञानराधाने जिंकला ग्राहकांचा विश्वास !

    बीड- आज ही पतसंस्था बुडाली,या ठेवीदारांना धोका झाला,कोट्यवधी रुपये बुडवून संचालक फरार या अन अशा बातम्यांनी एकीकडे गोंधळ उडालेला असताना तब्बल सतरा वर्षांपासून ठेवीदार अन ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत ज्ञानराधा मल्टिस्टेट मात्र लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे.या पाठीमागे मुख्य प्रवर्तक सुरेश कुटे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड मेहनत आहे हे नाकारून चालणार नाही हे ही तितकेच…

  • आणखी सात आमदार दादांसोबत !

    मुंबई- राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पाडून पक्षावर दावा करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नागालँड मधील सातही आमदारांनी पाठिंबा दिला आहे.निवडणूक आयोगाकडे यामुळे अजित पवार यांची बाजू अधिकच भक्कम झाली आहे. अजित पवार यांच्या गटाला नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी पाठिंबा दर्शविला आहे. पाठिंबा दर्शविणाऱ्यांमध्ये ७ आमदारांचा सामावेश आहे. नागालँड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं…

  • मनोरुग्ण मुलांकडून बापाचा निर्घृण खून !

    बीड – डॉक्टरकीचे शिक्षण घेताना अपयश आल्याने वेडसर वागणाऱ्या एका मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता मारून गंभीर जखमी केले.उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या वृद्ध पित्याचा मृत्यू झाला.खळबळ उडवून देणारी ही घटना 18 जुलै रोजी शहरातील अंकुश नगरमध्ये घडली. दरम्यान आईच्या फिर्यादीवरून मुलावर खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सुरू होती. पोलि…