News & View

ताज्या घडामोडी

Tag: #एसपी बीड

  • तीस वर्षीय तरुणाचा खून !शहरात खळबळ !!

    बीड- शहरातील चराठा रोड भागात तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील तरुणाचा निर्घृण खून करण्यात आल्याचे उघडकीस आले असून पोलीस अधिक तपास करत आहेत. बीड शहरात 30 वर्षीय तरुणाची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. प्राथमिक माहितीवरून पांडुरंग नारायण माने असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळावर मृतदेहाच्या बाजूलाच (MH-23 AM…

  • नुकसानीचे तातडीने पंचनामे करा- कृषिमंत्री मुंडेंचे आदेश !

    परळी-कमी पावसात दमट हवामानामुळे गोगलगायीची समस्या निर्माण झाली आहे यामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे, याचे लवकरात लवकर पंचनामे करावे व नियमानुसार पुढील प्रक्रिया करावी असे निर्देश देत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे प्रतिपादन राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथे केले. कृषिमंत्री मुंडे यांनी आज परळी तालुक्यातील वाघबेट आणि वेळब…

  • आ संदिप क्षीरसागर यांचे जल्लोषात स्वागत !

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर बीडचे आ संदिप क्षीरसागर यांचे बीडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आ क्षीरसागर यांनी बीडमध्ये प्रवेश केला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.त्यानंतर बाईक रॅलीने बीड शहरातील वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले. आ.संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर शनिवार (दि.२२) रोजी…

  • तुकाराम मुंढे यांची कृषी,पशुसंवर्धन विभागात बदली !41 अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या!!

    मुंबई- राज्यातील तब्बल 41 आयएएस अधिकाऱ्यांच्या घाऊक बदल्या करण्यात आल्या आहेत.महिनाभरापूर्वी मराठी भाषा विभागात बदली झालेले तुकाराम मुंढे यांची आता कृषी आणि पशुसंवर्धन विभागात बदली करण्यात आली आहे. बीडचे माजी सीईओ अजित कुंभार हे अकोल्याचे जिल्हाधिकारी असतील. 1. राजेंद्र शंकर क्षीरसागर – मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई यांची जिल्हाधिकारी, मुंबई शहर मुंबई म्हणून नियुक्ती…

  • पतसंस्थेच्या व्यवहारात ज्ञानराधाने जिंकला ग्राहकांचा विश्वास !

    बीड- आज ही पतसंस्था बुडाली,या ठेवीदारांना धोका झाला,कोट्यवधी रुपये बुडवून संचालक फरार या अन अशा बातम्यांनी एकीकडे गोंधळ उडालेला असताना तब्बल सतरा वर्षांपासून ठेवीदार अन ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देत ज्ञानराधा मल्टिस्टेट मात्र लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे.या पाठीमागे मुख्य प्रवर्तक सुरेश कुटे आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांची प्रचंड मेहनत आहे हे नाकारून चालणार नाही हे ही तितकेच…

  • मनोरुग्ण मुलांकडून बापाचा निर्घृण खून !

    बीड – डॉक्टरकीचे शिक्षण घेताना अपयश आल्याने वेडसर वागणाऱ्या एका मुलाने जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी खलबत्ता मारून गंभीर जखमी केले.उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या वृद्ध पित्याचा मृत्यू झाला.खळबळ उडवून देणारी ही घटना 18 जुलै रोजी शहरातील अंकुश नगरमध्ये घडली. दरम्यान आईच्या फिर्यादीवरून मुलावर खुनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सुरू होती. पोलि…

  • पुतण्याच्या खांद्यावर काकांनी टाकली नवी जिम्मेदारी!राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी आ संदिप क्षीरसागर !!

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर बीडमधून एकमेव आ संदिप क्षीरसागर यांनी शरद पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पवार यांनी जिल्हाध्यक्ष यांच्यासह संपुर्ण कार्यकारिणी बरखास्त केली.बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी आ संदिप क्षीरसागर यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. पंधरा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्या तीस चाळीस…

  • रुग्णांकडून वसुली भोवली !एक निलंबित !

    बीड- जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून हप्ता वसुली केल्याप्रमाणे पैसे घेणाऱ्या जोहराबी शेख या कर्मचारी महिलेला निलंबित करण्यात आले आहे तर कौशल्या काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतले जात असल्याची बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी चौकशी केली.चौकशी अहवालात…

  • ऊसतोड कामगाराचा मुलगा कृषिमंत्री झाला याचा आनंद- धनंजय मुंडे!

    मुंबई – माझे वडील स्व पंडित अण्णा मुंडे यांनी ऊसतोडणी च काम केलं आहे,त्यामुळे ऊसतोड कामगाराचा मुलगा कृषिमंत्री झाल्याचा आपल्याला आनंद आहे.जास्तीत जास्त लाभार्थ्यांना या माध्यमातून लाभ देण्याचं काम आपण करू अस सांगताना नूतन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक रुपयात पीकविमा विचार योजनांचा आढावा घेत आपला वाढदिवस साजरा केला. राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी…

  • दादा वित्तमंत्री तर डीएम कृषिमंत्री !

    मुंबई- गेल्या दहा ते बारा दिवसापासून रखडलेलं राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झाला असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन तर बीडचे धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे आता अब्दुल सत्तार हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे राज्य मंत्रिमंडळात 5 जुलै रोजी सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे…