News & View

ताज्या घडामोडी

Tag: #आष्टी

  • धिंगाणा घालणारा पुरस्कार प्राप्त शिक्षक सस्पेंड !

    बीड- पदोन्नती साठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात येऊन धिंगाणा घालणारा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विजय आमटे याला सीईओ अविनाश पाठक यांनी सस्पेंड केले आहे.या कारवाईने खळबळ उडाली आहे. आष्टी तालुक्यातील शिक्षक विजय आमटे हे गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती ची फाईल का काढली नाही यासाठी जिल्हा परिषदेत चकरा मारत होते.5 जानेवारी रोजी त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात…

  • गुरुची विद्या गुरूला परत,मी कच्या गुरूचा चेला नाही- धनंजय मुंडे !

    मुंबई – आदरणीय पवार साहेब हे माझे गुरू आणि दैवत आहेत, याआधी त्यांनी सत्तापटाचा जो कार्यक्रम करून दाखवला, तसाच कार्यक्रम आम्हीही केला, शेवटी मीही कच्च्या गुरूचा चेला नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.

  • जिल्ह्यातील 76 मास्तरांचे टीईटी प्रमाणपत्र रद्द !

    बीड (प्रतिनिधी) – राज्यभरात गाजलेल्या शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) गैरप्रकार प्रकरणात महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने कारवाई सुरू केली आहे. बीड जिल्ह्यातील 2018-19 मध्ये टीईटी उत्तीर्ण झालेल्या 76 उमेदवारांची संपादणूक रद्द करण्यात आली असुन त्यांचे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षा सन 2018-19 मधील प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. या संदर्भात राज्य परिक्षा परिषदेने दि.20 जुन 2023 रोजी…

  • प्रेमविवाह झाला अन तीन महिन्यात मुलीची आत्महत्या !

    बीड- प्रेमविवाह होऊन तीन महिन्याचा काळ होत नाही तोच प्रेमाला नजर लागली अन् तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना बीड  जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील ढोबळसांगवी इथे घडली आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात सासू आणि पतीच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल आदेश चौधरी (वय 20 वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे…

  • आष्टीमध्ये बालविवाह ! विजय गोल्हार यांच्याविरुद्ध गुन्हा !!

    आष्टी- एकीकडे राज्य सरकार,पोलीस हे सगळे बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती करत असताना भाजपच्या माजी जी प अध्यक्षांच्या पतीने बालविवाह लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी पोलिसात तब्बल तीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आष्टी तालुक्यातील वेताळवाडीमध्ये हा बालविवाह लावण्यात आला. याप्रकरणी आता भाजप नेता विजय गोल्हार यांच्यासह नवरी व नवरदेवाचे आई- वडिल, फोटोग्राफर, आचारी, भटजी यांच्यासह…

  • माझ्यासाठी दिल्ली खूप दूर – धनंजय मुंडे यांनी जोडले पत्रकारांसमोर हात !

    बीड- मी राज्यातच काम करण्यास इच्छुक असून माझ्यासाठी दिल्ली अजून वीस-पंचवीस वर्ष दूर आहे असं म्हणत राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी लोकसभेसाठी त्यांच्या नावाची होणारी चर्चा थांबवली . जवाहर आणि वैद्यनाथ मध्ये दोघा बहीण भावांची झालेली अंडरस्टँडिंग ही नवे समीकरण उदयाला घालणार आहे का या प्रश्नावर त्यांनी पत्रकारांसमोर हात जोडत हे तुम्ही समोरच्यांना सुद्धा…

  • ऑन ड्युटी अटॅक, पोलिसाचा मृत्यू !

    बीड- कर्तव्यावर असताना पोलीस कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका आला अन त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. युवराज राऊत असे मृत पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले आणि मूळचे नाळवंडी येथील रहिवासी पोलीस कर्मचारी युवराज राऊत हे सकाळी पाटोदा पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होते.त्यावेळी त्यांना छातीत दुखू लागल्याने बीडला…

  • दिव्यांग शिक्षकांची जे जे मध्ये होणार तपासणी !

    बीड- जिल्हा परिषदेच्या बदल्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडणाऱ्या तब्बल 41 शिक्षकांना 31मे पर्यंत मुंबईच्या जे जे रुग्णालयात हजर राहून तपासणी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.शिक्षकांनी हा अहवाल वेळेत न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदलाच्या वेळी तब्बल 300 पेक्षा जास्त शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र…

  • देवस्थान जमीन घोटाळ्यात फडणवीस यांच्याकडून आ धस यांची पाठराखण !

    बीड- देवस्थान जमीन घोटाळ्यातील आरोपी आ सुरेश धस यांना वाचवण्यासाठी स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने महासंचालक प्रयत्न करत असल्याचा आरोप फिर्यादी राम खाडे यांनी केला आहे.खाडे यांनी अप्पर मुख्य सचिवांकडे केलेल्या तक्रारीत हे आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात हिंदू देवस्थानच्या जमिनी भूखंड माफियांनी गिळंकृत करत कोट्यावधींचा घोटाळा केल्याची…

  • आधार लिंक नसल्याने 32 लाख शेतकरी अनुदानापासून वंचित !

    बीड- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेत आधार लिंक नसणे व इतर गोष्टींमुळे राज्यभरातील तब्बल 32 लाख शेतकरी यावेळच्या हप्त्यापासून वंचित राहणार आहेत. केंद्राच्या निकषांची पूर्तता न केल्याने राज्यातील ३२ लाख ३७ हजार शेतकरी राज्य सरकारच्या पहिल्याच हप्त्याला मुकणार असल्याची सद्य:स्थिती आहे. अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान…