मुंबई-केवळ बीड, परभणी नव्हे ते यावर्षी सबंध महाराष्ट्रात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गंभीर असून, शेतकऱ्यांच्या अतिरिक्त ऊसाचे गाळप होईपर्यंत बीड व आजूबाजूच्या जिल्ह्यातील कारखाने सुरू ठेवण्याचे निर्देश राज्य शासनाने साखर कारखान्यांना दिलेले आहेत. अतिरिक्त उसाच्या प्रश्नामुळे परिस्थिती गंभीर असली तरी राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीशी उभे आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी संयम ठेवावा असे आवाहन करतानाच अगदी […]
मराठवाड्यातील अतिरिक्त ऊस शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास ठरतोय !
बीड- बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात जवळपास 24 लाख मेट्रिक टन ऊस अजूनही शेतात उभा आहे.बारा चौदा महिने झाले तरी तोड होत नसल्याने उसाला पांढरे तुरे आले आहेत.लाख मोलाचं पीक डोळ्यादेखत वाळून जात असल्याने शेतकरी हताश झाला आहे.राज्य सरकारने याबाबत स्थानिक प्रशासनामार्फत उपाययोजना सुरू केल्या असल्या तरी मे अखेर पर्यंत कारखाने सुरू राहील तरी संपूर्ण उसाचे […]
सत्यनारायण उरकताच नवरदेवाने केली आत्महत्या !
माजलगाव – तालुक्यातील नितरूड येथील घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.पांडुरंग डाके या 26 वर्षीय तरुणाने लग्नानंतर सत्यनारायण ची पूजा झाली अन लगेच शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. नितरुड येथील पांडुरंग डाके याचे थाटात लग्न झाले.घरात आनंदी वातावरण होते. पांडुरंग च्या लग्नानंतर सत्यनारायण पूजा घालण्यात आली.पाहुणे रावळे जेवण करण्यात […]
आधी पंचनामे मगच मदत !
बीड – मराठवाड्यासह ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला त्यांना हेक्टरी दहा हजाराची मिळणारी मदत देताना राज्य शासनाने खुट्टी मारली आहे.पंचनामे झाल्याशिवाय मदत देऊ नये असा आदेश शासनाने काढल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे . बीड जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक नष्ट झाले.लाखो हेक्टर जमीन खरडून […]
अतिवृष्टीचा जिल्ह्यातील पहिला बळी ! सिरसमार्ग च्या शेतकऱ्याची आत्महत्या !!
बीड : अतिवृष्टीमुळे शेतीसह पीक वाहून गेले. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेतून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सिरसमार्ग (ता. गेवराई) येथे १ ऑक्टोबर रोजी घडली. अतिवृष्टी नुकसानीचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. भाऊसाहेब दशरथ पांढरे (५५, रा. सिरसमार्ग, ता. गेवराई) असे मयताचे नाव आहे. ते अल्पभूधारक होते. घर बांधणीसाठी त्यांनी खासगी […]