बीड- गेवराई विधानसभा मतदार संघातील दगडी शहाजानपूर येथील नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टर वर पोलिसांनी कारवाई केली,मात्र वाळू माफियांनी पोलिसांशी संगनमत करून जप्त केलेल्या ट्रॅक्टर चे मुंडके काढून नेत दुसरे मुंडके लावल्याचा प्रकार घडला आहे.पोलीस मात्र यावर मूग गिळून गप्प आहेत. बीड तालुक्यातील दगडी शहाजानपूर (चकला) येथे तीन महिन्यांपूर्वी वाळू माफियांनी सिंदफणा नदीपात्रात केलेल्या खड्या […]
वाळू माफिया जोरात,प्रशासन कोमात !
बीड- जिल्हाधिकारी अन गेवराई तहसीलदार, एस पी,डीवायएसपी या सगळ्यांनी मिळून गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांना निव्वळ वेड्यात काढले आहे.पवार यांनी उपोषण केल्यानंतर कारवाईच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या महसूल अन पोलिसांनी आठ दिवसात केवळ एक हायवा जप्त केला आहे.आजही वाळू घाटावरून जेसीबी,पोकलेन,केन्या अन बोटीने वाळू उपसा सुरू असून आमदार महोदयांच्या उपोषणाने वाळूचे रेट कमी झाले नसले तरी […]
कलेक्टर अन एसपी आमदारांनी उपोषण करण्याची वाट बघत होते का ?
बीड- बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर अनधिकृत अन अधिकृत वाळू उपसा सुरू आहे.सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत,वाळू माफिया मोकाट आहेत या सगळ्या गोष्टी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना माहीतच नव्हत्या का?प्रशासन इतक्या दिवस झोपा काढत होतं का?आमदार कधी उपोषण करतात अन आपण कधी वाळू कंत्राटदार यांची बैठक घेतो याची वाट पाहत […]
आमदार उपोषणात अन प्रशासन वाळू माफियांच्या दारात !
बीड- गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून वाळूचा बेसुमार उपसा चालू आहे.शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून सुरू असलेल्या वाळू उपशावर बंदी घालावी,महसूल अन पोलीस प्रशासनातील हप्तेखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी भाजपचे आ लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गेवराई तालुक्यातील ज्या वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत तेथून जेसीबी,पोकलेन,केन्या अन बोटीने वाळू उपसा सुरू […]
पक्के राजकीय वैरी,वाळूच्या धंद्यात मात्र जोमदार यारी !
बीड – बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात ज्या घराण्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे असे पंडित असोत की भाजप राष्ट्रवादी चे पदाधिकारी. बीड जिल्ह्यात वाळूच्या धंद्यात मात्र यांची जोमदार यारी असल्याचे चित्र पहावायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त तब्बल सत्तर किलोमीटर च्या परिसरात गोदावरी काठ हा गेवराई तालुक्यात आहे.हा गोदावरीचा काठ म्हणजे राजकीय पुढाऱ्यांसाठी सोन्याची […]
महसूल अन पोलिसांच्या डोळ्यावर पैशाची झापड !
बीड- गेवराई,माजलगाव, परळी,आष्टी,शिरूर या तालुक्यातून अधिकृत आणि अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या माफियांनी नदीपात्राचे वाटोळं केलं आहे.जेसीबी,पोकलेन,केन्या आणि बोटीने वाळू उपसा सुरू असताना महसूल आणि पोलीस प्रशासन मात्र कारवाई न करता बघ्याची भूमिका घेत आहे.कारण वाळू ठेकेदार हे पुढारी आहेत अन त्यांनी प्रशासनाच्या तोंडात पैशाचा बोळा कोंबला आहे,त्यामुळे कारवाई होण्याची शक्यता नाहीये. बीड जिल्ह्यात सगळे अवैध […]
माजी आमदार पुत्रासाठी कायद्याची पायमल्ली !
बीड- बीडचे माजी आमदार सय्यद सलीम यांच्या वाळूचा ठेकेदार असलेल्या मुलांसाठी कायद्याची पायमल्ली करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.महसूल प्रशासन आणि मंत्र्यांना हाताशी धरून सलीम यांनी आपल्या मुलाचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यातील गोदाकाठ हा जिल्ह्यातील राजकीय पुढारी,महसूल चे अधिकारी,पोलीस अधिकारी यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.युध्दाजित पंडित असोत की विजयसिंह […]
डीवायएसपी लोढा यांचा वाळू माफियांना दणका !
गंगाखेड – एकीकडे बीड जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र पुढाऱ्यांच्या सहकार्याने वाळू माफियांनी हैदोस घातला असताना दुसरीकडे बीडचे सुपुत्र तथा गंगाखेड चे पोलोस उपाधीक्षक श्रेणीक लोढा यांनी वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या आहेत.तब्बल 98 वाळू माफियांवर गुन्हे दाखल करत लोढा यांनी 38 आरोपी ताब्यात घेतले आहेत.या कारवाईत पोलिसांनी साडेसात कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. परभणी जिल्ह्यात वाळू माफियांनी […]
वाळू असो की ऊस अथवा आग दुर्घटना घडल्यावर प्रशासन का जागे होते ?
विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर कोणतीही दुर्घटना घडली की प्रशासन तातडीने जागे झाल्यासारखे करते,मंत्री संत्री,जिल्हाधिकारी, तहसीलदार पासून सगळे झाडून पुसून भेटी देतात.राजकीय पक्षाचे पदाधिकारी पर्यटन केल्याप्रमाणे भेटीगाठी देऊन सांत्वन करतात अन पुन्हा नव्या दुर्घटनेपर्यंत हातावर हात धरून बसतात.हे चित्र गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळीकडे दिसते.हा मानवी स्वभावातील दोष म्हणायचा की पाट्या टाकण्याची सरकारी मनोवृत्ती म्हणायची . […]
महसूल क्रीडा स्पर्धेत गुंग अन माफिया वाळू उपसण्यात दंग !
बीड- बीड जिल्ह्यातील तलाठ्यापासून ते जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत अनेक अधिकारी अन कर्मचारी हे महसूल क्रीडा स्पर्धेत गुंतले आहेत,त्यामुळे रान मोकळे असलेल्या वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. गेवराई सह अनेक तालुक्यात नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा सुरू असल्याचे चित्र आहे. दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या महसूल विभागाच्या क्रीडा स्पर्धा यावर्षी नांदेड येथे आयोजित केल्या आहेत.दोन वर्षे कोरोनामुळे स्पर्धा […]