विशेष संपादकीय / लक्ष्मीकांत रुईकर निवडणूक मग ती ग्रामपंचायत असो की लोकसभा, विधानसभा प्रत्येक ठिकाणी पक्षीय बांधणी आणि पक्षीय एकोपा असल्यास विजय पदरात नक्कीच पडतो. मात्र राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजप अंतर्गत कलह विशेषतः चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल असलेली पक्षांतर्गत नाराजी भोवली हे स्पष्ट आहे. ग्राउंडवर काम करणारा एक उमेदवार विरुद्ध पक्षाच्या जीवावर लढणारा दुसरा […]
कसब्यात काँग्रेसचे धंगेकर विजयी तर चिंचवड मध्ये भाजपच्या जगताप आघाडीवर !
पुणे- भारतीय जनता पक्षाच्या हक्काच्या कसबा मतदारसंघात मतदारांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे. सुरवातीपासूनच भाजपसाठी कठीण झालेल्या या मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा अकरा हजाराच्या फरकाने पराभव केला.पिंपरी चिंचवड मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांच्यापेक्षा दहा हजार मतांची आघाडी घेत विजयाकडे वाटचाल सुरू केली आहे.चिंचवड मध्ये शिवसेनेचे बंडखोर […]
चौसळा सर्कलमध्ये आ क्षीरसागर यांचा विकास कामांचा धडाका !
बीड- बीड मतदारसंघातील चौसाळा सर्कलमध्ये आ संदिप क्षीरसागर यांच्या हस्ते कोट्यवधी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.येत्या दोन वर्षात मतदारसंघातील सर्व समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन यावेळी आ क्षीरसागर यांनी दिले. जलजीवन मिशन अंतर्गत अंजनवती,वानगाव,घरगाव,गोलंग्री या गावात 3 कोटी 86 लक्ष रूपयांची योजनेच्या प्रत्यक्ष कामाची सुरूवात आज झाली आहे. तसेच 15 […]
विक्रम काळे विजयाच्या मार्गावर !
औरंगाबाद – मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये मोठी आघाडी घेतली असून भाजपचे उमेदवार किरण पाटील हे दुसऱ्या क्रमांकावर तर मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार विश्वासराव हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत विजयासाठी 25000 मतांचा कोटा ठरवण्यात आला असून पहिल्या पसंती मध्ये एकाही उमेदवाराने हा कोटा पूर्ण न […]
मला तुरुंगात टाकण्याचा डाव – फडणवीस !
मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्यासाठी अनेक प्लॅन केले गेले,संजय पांडे यांना ते टार्गेट देण्यात आले होते असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनीच आपल्यासाठी मातोश्री चे दरवाजे बंद केले असंही फडणवीस म्हणाले. एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना फडणवीस यांनी अनेक मुद्यावर स्पष्टपणे आपली भूमिका […]
राऊत यांचा दसरा कोठडीतच !
मुंबई- शिवसेनेचे खा संजय राऊत यांचा दसरा बहुतेक कोठडीत जाणार अशी शक्यता आहे.कारण न्यायालयाने त्यांच्या कोठडीत4 ऑक्टोबर पर्यंत वाढ केली आहे.गेल्या दोन महिन्यांपासून राऊत हे कोठडीत आहेत. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आर्थर रोड कारागृहामध्ये मुक्काम वाढला आहे. न्यायालयाने सोमवारी संजय राऊत यांच्या कोठडीमध्ये ४ आँक्टोंबरपर्यंत वाढ केली आहे. संजय राऊत यांचे […]
अनिल देशमुख यांना दिलासा नाहीच !
मुंबई – महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दाखल केलेला जामीन अर्ज विशेष सीबीआय न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे देशमुख यांचा सीबीआय कोठडीतला मुक्काम वाढला आहे.तसेच, देशमुखांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांचाही जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. सीबीआयने देशमुख आणि त्यांचे कथित सहकारी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे […]
शनिवारी नव्या सरकारची बहुमत चाचणी !
मुंबई- राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या सरकारची बहुमत चाचणी शनिवारी होणार आहे.शनिवार अन रविवारी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन होईल,यामध्ये नव्या सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षाला गुरुवारी पूर्णविराम मिळाला.एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर या दोघांनी मंत्रालयात जाऊन पदभार स्वीकारला. […]
अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा !
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली.लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे राजीनामा देणार असल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने आज दुपारीच दिले होते,त्यांच्या राजीनाम्याने आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.त्याचसोबत […]
बंडखोर मंत्र्यांची खाती इतरांकडे वर्ग !
मुंबई- राज्यातील सत्तानाट्य थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बंडखोर मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याकडील खाते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.त्यामुळे ठाकरे यांना अद्यापही महाविकास आघाडी सरकार सत्तेत कायम राहील हा विश्वास असल्याचे स्पष्ट होत आहे. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे […]