बीड- सकल मराठा समाजाच्या वतीने बीड येथे वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल 988 लग्न इच्छुक मुला मुलींनी आणि पालकांनी यात सहभाग घेतला.अत्यंत नेटकं अन सुंदर नियोजन, स्वतंत्र बैठक व्यवस्था यामुळे हा मेळावा आगळावेगळा ठरला. सर्व समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धत सुरू झाल्यामुळे मुलांच्या विवाह साठी विविध समस्यांचा पालकांना सामना करावा लागत आहे. या […]
मॅट च्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती !
मुंबई- आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून नोकरी मिळालेल्या परंतु मॅट ने नियुक्ती रद्द केलेल्या मराठा समाजातील उमेदवारांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.मॅट च्या निर्णयाला स्थगिती मिळाल्याने मराठा उमेदवारांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 2019 च्या अभियांत्रिकी सेवा भरतीमध्ये मराठा उमेदवारांना एसईबीसी कोटय़ातून दिलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर अडचणीत सापडली. त्यानंतर राज्य सरकारने एसईबीसी आरक्षणाला पात्र ठरलेल्या […]
आरक्षणप्रश्नी खा छत्रपती संभाजी राजे पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर !
मुंबई – मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकार जाणीवपूर्वक लांबवत आहे, दिलेली मुदत संपल्याने आपण रायगडापासून पुन्हा नव्याने राज्याचा दौरा येत्या 25 ऑक्टोबर पासून करणार असल्याची घोषणा खा छत्रपती संभाजी राजे यांनी केली . येत्या 25 ऑक्टोबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहे. रायगडपासून या दौऱ्याला सुरुवात करणार आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही काहीच केलं नाही. सारथीचा एक मुद्दा […]
मराठा आरक्षण प्रश्नी छत्रपती संभाजीराजेंनी घेतली राष्ट्रपतींची भेट !!
नवी दिल्ली – मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविण्यासाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवन येथे भेट घेतली. गेल्या अनेक दशकांच्या आर्थिक दारिद्रयामुळे मराठा समाज हा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मागासलेला आहे. त्यामुळे मराठा समाजास मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजास आरक्षण […]
मराठा क्रांती भवनसाठी जागा उपलब्ध ! नगराध्यक्ष यांची शब्दपूर्ती !!
बीड (प्रतिनिधी) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबीत असलेला बीड येथील ‘मराठा क्रांती भवन’ चा प्रश्न मार्गी लागला असून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते भूखंड हस्तांतरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सुवर्णक्षणाचे साक्षीदार होण्यासाठी समाजातील संपूर्ण समाजबांधवांनी उद्या 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राजमाता जिजाऊ उद्यानच्या बाजूला राजीव गांधी चौक येथे उपस्थित रहावे असे […]
मराठा आरक्षण, केंद्राने वटहुकूम काढावा – संभाजीराजे !
पुणे – सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे एससीबीसी करण्याचा राज्याला अधिकार नाही हे स्पष्ट होत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी आता घटनादुरुस्तीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र सरकारने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती करावी, अशी मागणी खासदार संभाजी छत्रपती यांनी केली आहे. खासदार संभाजी छत्रपती आज पुण्याच्या वाघोलीत आले होते. आजपासून त्यांनी जनसंवाद […]
केंद्राची मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली !
नवी दिल्ली – मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका न्यायालयाने फेतलाऊन लावली आहे .मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारनं सुप्रीम कोर्टात दाखल केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. 102 व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना SEBC कायद्याअंतर्गत एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार राज्यांना नाही, असं सुप्रीम कोर्टाच्या पाच जजेसच्या बेंचनं निकाल दिला होता. त्याच […]
आ मेटे यांच्यासह मोर्चेकऱ्यांवर गुन्हा दाखल !
बीड – जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असताना मोर्चा काढून या कायद्याचे तसेच जमावबंदी आणि संचारबंदी चे उल्लंघन केल्याप्रकरणी आ विनायक मेटे यांच्यासह 21 मोर्चेकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . बीड येथे मराठा आरक्षणाच्या विषयावरून आ विनायक मेटे,नरेंद्र पाटील यांच्यासह हजारो मराठा बांधवांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला .जिल्ह्यात सध्या जमावबंदी […]
काँग्रेसचा मराठा आरक्षणाला विरोध – आ मेटे !
बीड – मोर्चाला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकांचे पोट दुखत आहे,त्यामुळे अनेक जण याला विरोध करत आहेत,हे चुकीचे आहे,काँग्रेसचा हा विरोध मराठा समाजाबद्दल असलेला आकस दाखवून देणारा आहे,मराठा समाज आणि महाराष्ट्राबद्दल काँग्रेसचे धोरण विरोधी राहिलेलं आहे असा आरोप करत कोणी विरोध केला तरी मोर्चा निघणारच अस आ विनायक मेटे यांनी स्पष्ट केलं . स्व अण्णासाहेब पाटील […]
मराठा आरक्षण मोर्चा निघणारच – आ मेटे,पाटील !
बीड – बीड येथे मराठा आरक्षणाच्या विषयावर आयोजित केलेला मोर्चाला मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आ नरेंद्र पाटील आणि आ विनायक मेटे यांनी केले .बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत कोणत्याही परिस्थितीत मोर्चा निघणारच असा निर्धार यावेळी आ मेटे यांनी केला . स्व.आण्णासाहेब पाटील यांनी 1982 मध्ये पाहीलेले व त्यासाठी दिलेले बलीदान दिलेले […]