मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द फिरवला अस सांगत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी राज्यसभा निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.यापुढे आपण स्वराज्य संघटनेची बांधणी करणार असून आपली ताकद दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिला. खा,संभाजी राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राज्यसभा निवडणुकीवरून सुरू झालेला छत्रपती संभाजी […]
कलेक्टर अन एसपी आमदारांनी उपोषण करण्याची वाट बघत होते का ?
बीड- बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर अनधिकृत अन अधिकृत वाळू उपसा सुरू आहे.सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत,वाळू माफिया मोकाट आहेत या सगळ्या गोष्टी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना माहीतच नव्हत्या का?प्रशासन इतक्या दिवस झोपा काढत होतं का?आमदार कधी उपोषण करतात अन आपण कधी वाळू कंत्राटदार यांची बैठक घेतो याची वाट पाहत […]
आमदार उपोषणात अन प्रशासन वाळू माफियांच्या दारात !
बीड- गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून वाळूचा बेसुमार उपसा चालू आहे.शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून सुरू असलेल्या वाळू उपशावर बंदी घालावी,महसूल अन पोलीस प्रशासनातील हप्तेखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी भाजपचे आ लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गेवराई तालुक्यातील ज्या वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत तेथून जेसीबी,पोकलेन,केन्या अन बोटीने वाळू उपसा सुरू […]
रक्तदात्यांचे अनुदान बांगर अँड कंपनीने हडपलेच !
बीड – राष्ट्रीय कार्य म्हणून रक्तदान करून रुग्णांचे जीव वाचविणाऱ्या रक्तदात्यांच्या नावावर येत असलेले अनुदान डॉ जयश्री बांगर अन रक्तपेढीमधील कर्मचाऱ्यांनी हडप केल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. याबाबत न्यूज अँड व्युज ने आवाज उठवला होता,मात्र असे काही अनुदान येतच नाही असा दिखावा बांगर अँड कंपनीने उभा केला होता.मात्र आरोग्य विभागाच्या अहवालामुळे त्यांचा […]
दुचाकीवरून पाठलाग करत हत्या !
बीड- रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत दुचाकीवरून पाठलाग करत एका तरुणाचा निर्घृण खून केल्याची थरारक घटना बीड नजीक घडली.बहिणीशी असलेल्या अनैतिक संबंधातून हा थरार घडल्याचे समोर आले आहे.जिल्ह्यात घडणारे बलात्कार आणि खुनाचे सत्र यामुळे कायदा आणि सुव्यवस्था हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बीड तालुक्यातील मंझरी येथील सिद्धेश्वर बहिरवाळ याच्या बहिणीशी गावातीलच ब्रम्हदेव कदम याच्याशी अनैतिक […]
भाशीप्र वर उत्कर्ष पॅनलचा झेंडा !
बीड- मराठवाड्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे असलेल्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान पदाधिकारी यांच्या उत्कर्ष पॅनेलने दणदणीत विजय मिळवला.मतमोजणी रात्री उशिरापर्यंत सुरू होती यामध्ये उत्कर्ष पॅनलचे जवळपास 16 उमेदवार विजयी झाले,उर्वरित चार जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत विद्यमान पदाधिकारी विरुद्ध माजी पदाधिकारी यांच्यात लढत होती.माजी कार्यवाह सतीश […]
अयोध्या दौरा ते औरंगजेबाची कबर,सगळ्या मुद्यावर राज यांनी घेतला खरपूस समाचार !
पुणे – अयोध्या दौरा असो की संभाजीनगर च नामांतर अथवा भोंग्याचा विषय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढविला. शिवसेनेने औरंगाबाद मध्ये एमआयएम ला वाढवले असा आरोप करीत हिंमत असेल तर नामांतर करून दाखवा असे आव्हान दिले. राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात करताच ते म्हणाले की, आपल्या सभांना हॉल पुरत नाही. […]
पेट्रोल डिझेल स्वस्त !
नवी दिल्ली- केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल 10 रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे.केंद्राने कर कमी केल्यावर आता राज्य सरकार कर कमी करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,राज्य सरकारच्या करांमुळे मोठ्या प्रमाणावर पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढत आहेत, […]
बहिणीच्या नावाखाली गणेश बांगर ला रक्तपेढीने पोसले !
बीड – जिल्हा रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या गणेश बांगर या कर्मचाऱ्याला बहीण जयश्री बांगर यांच्या आशीर्वादाने कामावर न येताच फुकट वेतन दिल्याचे उघड झाले आहे.आरोग्य विभागाच्या चौकशी अहवालात ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. बीड जिल्हा रुग्णालयात गणेश बांगर,जयश्री बांगर या दोन बहीण भावासोबत राजरतन जायभाये,अजिनाथ मुंडे,रियाज,ठाकर या कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात अक्षरशः […]
पक्के राजकीय वैरी,वाळूच्या धंद्यात मात्र जोमदार यारी !
बीड – बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात ज्या घराण्यांमधील राजकीय वैर सर्वश्रुत आहे असे पंडित असोत की भाजप राष्ट्रवादी चे पदाधिकारी. बीड जिल्ह्यात वाळूच्या धंद्यात मात्र यांची जोमदार यारी असल्याचे चित्र पहावायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात सगळ्यात जास्त तब्बल सत्तर किलोमीटर च्या परिसरात गोदावरी काठ हा गेवराई तालुक्यात आहे.हा गोदावरीचा काठ म्हणजे राजकीय पुढाऱ्यांसाठी सोन्याची […]