July 6, 2022

Tag: #बीड पंचायत समिती

जिल्हा निवड समितीला डावलून नियुक्ती ! आरोग्य विभागात जवळेकर पॅटर्न !!
आरोग्य, टॅाप न्युज, नौकरी

जिल्हा निवड समितीला डावलून नियुक्ती ! आरोग्य विभागात जवळेकर पॅटर्न !!

बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरू आहे.जिल्हा निवड समिती अर्थात जिल्हाधिकारी यांना अंधारात ठेवून जिल्हा आरोग्य विभागाने एका उमेदवाराला थेट आरोग्य सेवक पदी नियुक्ती दिली आहे.यामुळेमाजी जिल्हा परिषद सीईओ राजीव जवळेकर यांचा पॅटर्न पुन्हा सुरू झाल्याची चर्चा सुरू आहे. बीड जिल्हा परिषदेत 2014 साली आरोग्य सेवक गट क पदासाठी अपंग कोट्यातून अर्ज मागविण्यात […]

पुढे वाचा
गुट्टे यांच्यासह चार कर्मचारी निलंबित !
टॅाप न्युज, माझे शहर

गुट्टे यांच्यासह चार कर्मचारी निलंबित !

बीड-दिन दिवसांपूर्वी परभणी येथे बदली झालेले बीड नगर पालिकेचे वादग्रस्त मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्यासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.विधिमंडळात लक्षवेधी सुचनेसाठी माहिती न देता निघून आल्याप्रकरणी या पाच जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. बीड नगर पालिकेत रुजू झाल्यापासून कुठल्या ना कुठल्या कारणाने वादात अडकलेले मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांच्या विरोधात आ विनायक मेटे […]

पुढे वाचा
वैद्यनाथ च वाटोळं करून यांना झोप कशी येते – धनंजय मुंडे !
अर्थ, माझे शहर

वैद्यनाथ च वाटोळं करून यांना झोप कशी येते – धनंजय मुंडे !

बीड- राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांच्यावर टीका केलीय.वारसा हक्काने कारखाना मिळाला ते गडगंज झाले मात्र संस्था उध्वस्त झाली,या लोकांना झोप तरी कशी येते अशी टीका त्यांनी केली. अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम समाप्ती कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते.ते पुढे म्हणाले की,ज्यांना वारसा हक्काने कारखाना मिळाला, ते […]

पुढे वाचा
कलेक्टर अन एसपी आमदारांनी उपोषण करण्याची वाट बघत होते का ?
टॅाप न्युज, माझे शहर

कलेक्टर अन एसपी आमदारांनी उपोषण करण्याची वाट बघत होते का ?

बीड- बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर अनधिकृत अन अधिकृत वाळू उपसा सुरू आहे.सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत,वाळू माफिया मोकाट आहेत या सगळ्या गोष्टी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना माहीतच नव्हत्या का?प्रशासन इतक्या दिवस झोपा काढत होतं का?आमदार कधी उपोषण करतात अन आपण कधी वाळू कंत्राटदार यांची बैठक घेतो याची वाट पाहत […]

पुढे वाचा
धनुभाऊ, एमएससीबी च्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा !
आरोग्य, माझे शहर

धनुभाऊ, एमएससीबी च्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा !

अंबाजोगाई – जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धनुभाऊ तुम्ही तब्बल सतरा कोटी रुपये खर्चून अंबाजोगाईत एस आर टी रुग्णालयासाठी एमआरआय मशीन मागवली,मात्र सहा महिने झाले तरी एम एस सी बी च्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन न जोडल्याने कोट्यवधींची मशीन धूळखात पडून आहे.धनुभाऊ आता एकदा या मुजोर अधिकाऱ्यांची कानउघाडणी करा अन रुग्णसेवेत ही मशीन उपलब्ध करा. राज्याचे सामाजिक न्याय […]

पुढे वाचा
पावसाचा अंदाज घेऊन निवडणूक घ्या – सर्वोच्च न्यायालय !
टॅाप न्युज, देश

पावसाचा अंदाज घेऊन निवडणूक घ्या – सर्वोच्च न्यायालय !

नवी दिल्ली- जून ठिकाणी पाऊस पडत नाही किंवा कमी पडतो त्या ठिकाणी निवडणूक घ्यायला काय हरकत आहे असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक बाबत निर्णय घ्यावा असे म्हटले आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून पुढे ढकलण्यात आल्या आहेत.याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने निवडणूक आयोगाला […]

पुढे वाचा
माजी आमदार पुत्रासाठी कायद्याची पायमल्ली !
टॅाप न्युज, माझे शहर

माजी आमदार पुत्रासाठी कायद्याची पायमल्ली !

बीड- बीडचे माजी आमदार सय्यद सलीम यांच्या वाळूचा ठेकेदार असलेल्या मुलांसाठी कायद्याची पायमल्ली करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.महसूल प्रशासन आणि मंत्र्यांना हाताशी धरून सलीम यांनी आपल्या मुलाचे कल्याण करण्याचा प्रयत्न केला आहे. बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यातील गोदाकाठ हा जिल्ह्यातील राजकीय पुढारी,महसूल चे अधिकारी,पोलीस अधिकारी यांच्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.युध्दाजित पंडित असोत की विजयसिंह […]

पुढे वाचा
योग दिंडी आपल्या दारी !
आरोग्य, माझे शहर

योग दिंडी आपल्या दारी !

बीड – काकू -नाना प्रतिष्ठान, पतंजली योग समिती बीड व सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीक वैद्यकीय महाविद्यालय बीड यांच्या संयुक्त विद्यमाने 365दिवसांचे योग प्राणायाम शिबीर. 21जून जागतिक योग दिनानिमित्त काकू -नाना प्रतिष्ठान व पतंजली योग समिती गेल्या 8वर्षांपासून बीड शहरातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून योग दिंडी आपल्या दारी हे अभियान राबवत आहे. मागच्या दोन वर्षात कोरोना […]

पुढे वाचा
ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषदेचा रणसंग्राम !
टॅाप न्युज, राजकारण

ऐन पावसाळ्यात जिल्हा परिषदेचा रणसंग्राम !

बीड – बीड जिल्हा परिषद आणि अकरा पंचायत समितीच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होण्याची चिन्हे आहेत.प्रभाग रचना आणि गट गण रचनेचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.त्यामुळे जून ते ऑगस्ट च्या दरम्यान मिनी मंत्रालयासाठी मतदान होण्याची शक्यता आहे. राज्यातील २५ जिल्‍हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांची मुदत २१ मार्चला संपली आहे. या सर्व ठिकाणी सध्या प्रशासकाची […]

पुढे वाचा
राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका !
टॅाप न्युज, देश

राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका !

नवी दिल्ली- ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून पुढे ढकलण्यात आलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत्या दोन आठवड्यात जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राज्य सरकारला हा मोठा धक्का मानला जात आहे.सर्वोच्च न्यायालयाने आज हा निकाल दिल्याने आता राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील प्रलंबित स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम २ […]

पुढे वाचा
//updated on 06012022 disable right click