News & View

ताज्या घडामोडी

Tag: #बीड न्यूज अँड व्युज

  • तुम्ही माझं काय बघितलं- पवारांनी डागली अमरसिंह पंडितांवर तोफ!

    बीड- बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत शरद पवार हे ओबीसी नेते धनंजय मुंडे यांच्यावर बरसतील अस वाटत होतं पण पवारांनी टार्गेट केलं माजी आ अमरसिंह पंडित यांना.’तुम्ही माझं वय काढता,पण तुम्ही माझं अस काय काय बघितलं’अस म्हणत शेलक्या शब्दात पवारांनी पंडित यांच्यावर निशाणा साधला.पवारांच्या या हल्याने पंडितामध्ये खळबळ उडाली असणार यात शंका नाही….

  • पवारांनी काढली काकूंची आठवण अन केले आ संदिप क्षीरसागर यांचे कौतुक !

    बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीडच्या स्वाभिमान सभेत माजी खा स्व केशरकाकू क्षीरसागर यांची आठवण काढत नातू आ संदिप क्षीरसागर यांचे तोंडभरून कौतुक केले. निष्ठा काय असते हे संदिप ने दाखवून दिले अस म्हणत पवारांनी आ क्षीरसागर यांची पाठ थोपटली . बीड येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे…

  • माजीमंत्री बदामराव पंडितांच्या घरी शरद पवारांची खलबते !

    गेवराई- माजीमंत्री तथा शिवसेना नेते बदामराव पंडित यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजी नगर वरून बीडला येताना भेट दिली.यावेळी पवार आणि पंडित यांच्यामध्ये गुप्त खलबते झाली.माजी आ अमरसिंह पंडित यांनी अजित पवार यांची साथ दिल्याने पवारांनी बदामराव यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर…

  • वादग्रस्त भरती रद्द ! आरोग्यमंत्री सावंत यांचा निर्णय !!

    बीड- ज्या भरती प्रक्रियेवरून बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांचे निलंबन झाले ती भरती प्रक्रिया आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्थगित केली आहे.त्यामुळे पैसे देणाऱ्यांनी आता पुढाऱ्यांच्या घरी चकरा मारणे सुरू केले आहे. बीडच्या लोखंडी सावरगाव या ठिकाणच्या रुग्णालयात आरोग्य भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या भरतीचे कंत्राट ज्या कंपनीला देण्यात आलं…

  • मनसैनिकांनी फोडले मुख्याधिकाऱ्यांचे दालन !

    बीड- शहरातील प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे आणि स्वच्छता या विषयावरून बीडमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले.दोन दिवसांपूर्वी खड्याभोवती रांगोळी काढून निषेध करणाऱ्या या सैनिकांनी शुक्रवारी सकाळी नगर परिषद मुख्याधिकारी यांचे दालन फोडले. बीड शहरातील मोंढा आणि एमआयडीसी भागात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनकेदा मागणी करुनही या रस्त्याची दुरुस्ती होत नव्हती. तर या खड्यामुळे…

  • परळीत गोळीबार तीन राउंड फायर !

    परळी- चहाच्या हॉटेलवर सिगारेटचे पाकीट महाग का दिले म्हणून गोळीबार केल्याची घटना रात्री दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान घडली.तब्बल तीन राउंड फायर झाल्याने खळबळ उडाली आहे. सदरील घटना कण्हेरवाडी शिवारात घडली. परळी पासून नजीकच असलेल्या कण्हेरवाडी शिवारात सुरेश फड यांचे यशराज हॉटेल आहे,जे विलास आघाव हे मागील एक वर्षांपासून चालवतात.या ठिकाणी रात्री एक वाजण्याच्या सुमारास…

  • कोरोना काळात निलंबित झालेल्या डॉ चव्हाण यांच्याकडे बीडचा पदभार !

    बीड- जळगाव येथे जिल्हा शल्य चिकित्सक पदावर असताना कोरोना काळात साहित्य खरेदी प्रकरणी निलंबित झालेल्या डॉ नागेश चव्हाण यांच्याकडे बीडच्या शल्य चिकित्सक पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.विभागीय चौकशी सुरू असणाऱ्या अधिकाऱ्यावर जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.हा प्रकार म्हणजे आगीतून उठून फुफाट्यात पडण्यासारखे असल्याचे बोलले जात आहे. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक…

  • साबळे सस्पेंड पण भरती झालेल्यांवर कारवाई कधी ?

    बीड- ज्या ब्लॅकलिस्ट कंपनीमार्फत लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात भरती केल्याचे प्रकरण गाजले अन त्यात डॉ सुरेश साबळे यांच्यासारख्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली त्या भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर कधी कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात 73 कर्मचाऱ्यांची भरती केली.ही भरती करण्याची प्रक्रिया…

  • जिल्हा परिषदेचे कर्मचारी परस्पर महसूल अन स्टेटकडे वर्ग ! जाता जाता अजित पवारांचा कुटाना !!

    बीड- जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली ही स्टेट किंवा महसूल विभागात करता येत नाही,अन अशी बदली करायची असेल तर विभागीय आयुक्त यांच्याकडून परवानगी घ्यावी लागते,मात्र बीड जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार यांनी पशुसंवर्धन विभागातील एका चालकाची बेकायदेशीर पध्दतीने स्टेट पशुसंवर्धन विभागात बदली केली आहे.हे कमी की काय म्हणून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एम आर…

  • डॉ साबळेंच्या निलंबनाचे आदेश !नांदेड असणार मुख्यालय !!

    बीड- लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात करण्यात आलेल्या भरती प्रकरणात जोशी ठरलेले बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉक्टर सुरेश साबळे यांच्या निलंबनाचे आदेश सोमवारी प्राप्त झाले आहेत निलंबन काळात डॉक्टर साबळे यांचे मुख्यालय नांदेड असणार आहे औषध निर्माण अधिकारी तानाजी ठाकर आणि रियाज शेख यांच्या कारभाराचा बळी डॉक्टर साबळे ठरले असल्याची चर्चा आहे आता ठाकर आणि…