बीड -बीड नगर पालिकेचा कारभार म्हणजे आंधळं दळताय अन कुत्रं पीठ खातंय असा झाला आहे.पैसे मोजा अन पाहिजे ते बेकायदेशीर काम करून घ्या असा प्रकार सुरू आहे.शाहूनगर भागातील नागरिकांनी अतिक्रमनाच्या विषयावर न्यायालयात धाव घेतलेली असताना बांधकाम परवाना देऊन नगर पालिकेने कहर केला आहे. येथील शाहूनगर भागात मौलाना आझाद नगर येथील रहिवासी शेख सलीम यांनी मागील […]
बोगस प्रमाणपत्र देणारे 52 शिक्षक निलंबित !
बीड- जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दाखल करून लाभ घेणाऱ्या 52 शिक्षकांवर मोठी कारवाई केली आहे.या सर्वांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच या सर्वांकडून बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर जेवढे लाभ घेतले आहेत त्यांची वसुली केली जाणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने शिक्षक बदलीच्या वेळी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारावर बदलीसाठी अर्ज केले होते.मात्र 356 शिक्षकांपैकी बहुतांश शिक्षकांनी […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे आ संदिप क्षीरसागर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !
बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड मतदार संघाचे आ संदिप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.बीड मतदारसंघात अनेक कामावर स्थगिती असल्याने ती उठवण्यात यावी अन मतदारसंघात नव्याने विकास कामांना मंजुरी द्यावी अशी मागणी यावेळी आ क्षीरसागर यांनी केली.मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिला. बीड विधानसभा मतदारसंघ 2022-23 या आर्थिक वर्षातील विविध विकासकामांवरील स्थगिती उठविण्यात […]
चंद्रकांत पाटलांच्या भिकेची आम्हाला गरज नाही – उद्धव ठाकरे कडाडले !
घनसावंगी – राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.चंद्रकांत पाटील यांच्या भिकेची आम्हाला गरज नाही,तुम्ही कोण आम्हाला भीक मागून शिकवणारे,बोलताना जरा तारतम्य ठेवून बोला अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी पाटलांना फटकारले. घनसावंगी येथे आयोजित 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर संमेलनाचे अध्यक्ष […]
धनंजय मुंडे यांचा पाठपुरावा ! जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 410 कोटींची मदत !!
मुंबई – बीड जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले होते. माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य सरकारने सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी राज्य शासनाकडून मदतीची घोषणा केली असून, यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी मराठवाड्यात सर्वाधिक 410 कोटी 22 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. माजी पालकमंत्री धनंजय […]
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटनासाठी नगर पालिकेने चालू कामे बंद केली !
बीड- नगरोथान योजने अंतर्गत महिनाभरापूर्वी सुरू करण्यात आलेली शहरातील तब्बल 12 रस्त्यांची कामे नगर पालिकेने बंद केली आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सदरील कामाचे उदघाटन होणार असल्याने ही कामे करू नयेत असे आदेश नगर पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी दिली आहेत.सुरू असलेली कामे बंद करण्याचा हा नगर पालिकेचा निर्णय तुघलकी असून तात्काळ कामे सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा […]
चार पिढ्याची साक्ष देणारे पिपरी चे झाड जमीनदोस्त !
बीड- शंभर वर्षापेक्षा जास्त काळापासून बीड शहर विशेषतः पेठ बीड भागाची ओळख असलेले पिंपरी (पिपरी) चे महाकाय झाड पहाटे कोसळले.सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.झाडाखाली असलेल्या दोन दुकानांचे यामध्ये नुकसान झाले. पेठ बीड भागच नव्हे तर संपूर्ण शहर वासीयांना पिपरी चे झाड हा एक लँडमार्क होते.माणसाच्या जन्मापासून ते अंत्यसंस्कार पर्यंत सगळे सामान पाहिजे असल्यास […]
पाटोदा नजीक अपघातात सहा ठार !
पाटोदा – आयशर टेम्पो आणि स्विफ्ट कार यांच्या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जखमींना पाटोदा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. पाटोदा शहरानजीक असलेल्या बामदळे वस्तीजवळ आयशर टेम्पो आणि स्विफ्ट कार यांचा समोरासमोर अपघात झाला.हा अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहने चक्काचूर झाली. जीवचिवाडी येथील रहिवासी असलेले […]
तलाठी,ग्रामसेवकांचा कारभार खाजगी लोकांच्या भरवशावर !
बीड- बीड जिल्ह्यातील बहुतांश तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या कार्यालयाचा कारभार सर्रास खाजगी व्यक्तींकडून चालवला जातो.हे खाजगी लोक कामासाठी येणाऱ्या लोकांची आर्थिक पिळवणूक करतात.30 – 70 किंवा 40 – 60 या हिशोबाने याची वाटणी होते.जर खाजगी व्यक्तीकडूनच कारभार करायचा तर या तलाठीण ग्रामसेवक मंडळींना पगार द्यायचा कशाला असा सवाल उपस्थित होत आहे. बीड शहरातील पिंगळे तरफ […]
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्थगित !
मुंबई – राज्यातील 25 जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली असून राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भातील परिपत्रक काढून माहिती दिली आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम १९६१ मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभमीवर जिल्हा परिषद, महापालिका आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, शिंदे फडणवीस सरकारने महापालिकांच्या […]