बीड- पत्नीच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत खुनाचे सत्र सुरूच राहील अशी चिठ्ठी लिहून वृद्ध शेतकऱ्याचा खून करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.आरोपीने खून केल्यानंतर वर्धा जिल्ह्यात आश्रय घेतला होता,पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करत त्याला अटक केली. खांबा लिंबा गावच्या नारायण सोनवणे हे आपल्या घरासमोर झोपले असताना त्यांच्यावर देखील धारदार शस्त्राने वार करून त्यांना जिवे […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला ! निवडणुकीतून माघार – छत्रपती संभाजी राजे !
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला दिलेला शब्द फिरवला अस सांगत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी राज्यसभा निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचा निर्णय जाहीर केला.यापुढे आपण स्वराज्य संघटनेची बांधणी करणार असून आपली ताकद दाखवून देऊ असा इशारा त्यांनी दिला. खा,संभाजी राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राज्यसभा निवडणुकीवरून सुरू झालेला छत्रपती संभाजी […]
अविनाश भोसले यास अटक !
मुंबई – राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे सासरे तथा बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआय ने अटक केली आहे.डी एच एफ एल प्रकरणात ही अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. येस बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राणा कपूर यांनी डीएचएफएलमध्ये 3700 कोटी रुपये कर्जऱोख्यांतून गुंतवले होते. यात राणा यांना 600 कोटींची दलाली मिळाल्याचे समोर आले होते. त्यानंतर डीएचएफएलने हे […]
रक्तपेढीतील रक्तातून चार बालकांना एचआयव्ही !
नागपूर – थॅलेसेमिया ग्रस्त बालकांन रक्तपेढीतून दिलेल्या रक्तातून चार बालकांना एचआयव्ही ची लागण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. नागपूर येथील या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.नागपूरच्या एका खाजगी रक्तपेढीतून चार बालकांना रक्त देण्यात आले.त्यानंतर या बालकांना एचआयव्ही ची लागण झाल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात […]
अनिल परब अडचणीत ! ईडीची छापेमारी !
मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे.परब यांच्याशी संबंधित पुणे,मुंबई आणि रत्नागिरी येथील सात ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित मुंबई आणि पुणे येथील एकूण सात ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु असल्याचे समजते. ईडीची एक टीम गुरुवारी सकाळी साडेसहा […]
विधानपरिषद निवडणूक जाहीर !
मुंबई – राज्य विधानपरिषद च्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे.20 जून रोजी यासाठी मतदान होईल आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.महाविकास आघाडी आणि भाजप कडून कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेचे 10 सदस्य जुलैच्या पहिल्या आठवड्यात निवृत्त होत आहेत. विधानसभेच्या संख्याबळानुसार भाजपचे चार तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन उमेदवार […]
कलेक्टर अन एसपी आमदारांनी उपोषण करण्याची वाट बघत होते का ?
बीड- बीड जिल्ह्यात विशेषतः गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर अनधिकृत अन अधिकृत वाळू उपसा सुरू आहे.सर्व नियम पायदळी तुडविले जात आहेत,वाळू माफिया मोकाट आहेत या सगळ्या गोष्टी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना माहीतच नव्हत्या का?प्रशासन इतक्या दिवस झोपा काढत होतं का?आमदार कधी उपोषण करतात अन आपण कधी वाळू कंत्राटदार यांची बैठक घेतो याची वाट पाहत […]
एचआयव्ही बाधितांनी घेतले सात फेरे !
बीड (प्रतिनिधी) शहरातील मॉ वैष्णो पॅलेस येथे 23 मे रोजी झालेल्या जुळून येती रेशीम गाठी या उपक्रमांतर्गत झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात एचआयव्ही संसर्गित सात जोडपे विवाहबध्द झाले. या सोहळ्यास वर्हाडी मंडळींनी मोठी गर्दी केली होती. बीड जिल्हा व्यापारी महासंघ (कॅट) सह एचसीसीपी प्लस, एनएमपी प्लस, बीड जिल्हा व्यापारी महासंघ (कॅट), बीड जिल्हा पोलिस प्रशासन, विहान […]
आमदार उपोषणात अन प्रशासन वाळू माफियांच्या दारात !
बीड- गेवराई तालुक्यातील गोदापात्रातून वाळूचा बेसुमार उपसा चालू आहे.शासनाचे सर्व नियम पायदळी तुडवून सुरू असलेल्या वाळू उपशावर बंदी घालावी,महसूल अन पोलीस प्रशासनातील हप्तेखोर अधिकाऱ्यांवर कारवाई करावी यासह विविध मागण्यांसाठी भाजपचे आ लक्ष्मण पवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. गेवराई तालुक्यातील ज्या वाळू घाटांचे लिलाव झाले आहेत तेथून जेसीबी,पोकलेन,केन्या अन बोटीने वाळू उपसा सुरू […]
रक्तदात्यांचे अनुदान बांगर अँड कंपनीने हडपलेच !
बीड – राष्ट्रीय कार्य म्हणून रक्तदान करून रुग्णांचे जीव वाचविणाऱ्या रक्तदात्यांच्या नावावर येत असलेले अनुदान डॉ जयश्री बांगर अन रक्तपेढीमधील कर्मचाऱ्यांनी हडप केल्याचा ठपका आरोग्य विभागाच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. याबाबत न्यूज अँड व्युज ने आवाज उठवला होता,मात्र असे काही अनुदान येतच नाही असा दिखावा बांगर अँड कंपनीने उभा केला होता.मात्र आरोग्य विभागाच्या अहवालामुळे त्यांचा […]