मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे आ राहुल नार्वेकर यांची निवड झाली.महाविकास आघाडीचे राजन साळवी यांचा नार्वेकर यांनी पराभव केला. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना भाजपचा हा पहिला मोठा विजय मानला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली.त्यानंतर शिवसेना भाजपच्या या नव्या सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी […]
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर फडणवीस उपमुख्यमंत्री !
मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात शपथ घेतली.दुपारी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण कुठलेही पद घेणार नाही असे म्हटले होते मात्र दिल्लीतून सूत्र हलली आणि संध्याकाळी शिंदे यांच्यासोबत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आलेल्या भूकंपानंतर भाजपच्या […]
अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा !
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली.लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे राजीनामा देणार असल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने आज दुपारीच दिले होते,त्यांच्या राजीनाम्याने आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.त्याचसोबत […]
देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला !
मुंबई- राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेता भाजपचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांना भेटण्यासाठी राजभवनात दाखल झाले आहेत.त्यामुळे नेमकं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरी करत आठवडा भरापूर्वी गुवाहाटी ला गेल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. […]
गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाने नऊ जनांचा जीव घेतला !
सांगली- गुप्तधन काढून देण्यासाठी मांत्रिकाला तब्बल 70 ते 80 लाख रुपये दिले.हे पैसे सावकाराकडून घेतले होते,सावकार तगादा लावू लागल्याने मांत्रिकाला वारंवार विचारणा सुरू झाली,शेवटी हा तगादा सहन न झाल्याने मांत्रिकाने मित्राच्या मदतीने तब्बल नऊ जणांना जेवणातून विष देऊन त्यांचा खून केला.ही थरारक घटना उघडकीस आली आहे सांगली जिल्ह्यात म्हैसाळ येथे. कोट्यवधींचे गुप्तधन मिळवून देतो म्हणून […]
बंडखोर मंत्र्यांची खाती इतरांकडे वर्ग !
मुंबई- राज्यातील सत्तानाट्य थेट सर्वोच्च न्यायालयात पोहचले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. बंडखोर मंत्री आणि राज्यमंत्री यांच्याकडील खाते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस च्या मंत्र्यांकडे वर्ग करण्यात आली आहेत.त्यामुळे ठाकरे यांना अद्यापही महाविकास आघाडी सरकार सत्तेत कायम राहील हा विश्वास असल्याचे स्पष्ट होत आहे. जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे […]
शिंदेंसेनेचा शिवसेनेला चेकमेट !
मुंबई- राज्याचे बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार हे लक्षात घेऊन भाजपने दोन दिवस अगोदरच मोठी खेळी केल्याचे समोर आले आहे.विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्यावरच अविश्वास ठराव दाखल असल्याचा दाखला देत दोन अपक्ष आमदारांनी शिवसेनेला चेकमेट दिला आहे.आता यावर काय होणार हे लवकरच स्पष्ट होईल. महेश बालदी आणि विनोद […]
आ सिरसाट यांनी मांडली सत्यपरिस्थिती !
मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारे औरंगाबाद पश्चिम चे आमदार संजय सिरसाट यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आमदार,खासदार यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. आमच्या जीवावर राज्यसभा, विधानपरिषद सदस्य झालेल्या लोकांनी आम्हाला आमच्या विठ्ठलपासून दूर केले हे तुम्हाला कधी समजलच नाही अस म्हणत सिरसाट यांनी निशाणा साधला आहे. श्री. उध्दवजी ठाकरे. […]
विधानसभा बरखास्त !
मुंबई – बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चाळीस पेक्षा अधिक सेना आमदार असल्याने सेनानेतृत्वाकडून शिंदे यांना समजावण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे चित्र आहे.त्यामुळे सेना नेते संजय राऊत यांचे ट्विट चर्चेत आले आहे.महाराष्ट्राचा प्रवास विधानसभा बरखासतीच्या दिशेने असे ट्विट राऊत यांनी केले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या चाळीस आमदारांना आसाम मधील गुवाहाटी येथे हलविण्यात […]
द्रौपदी मुर्मू भारताच्या राष्ट्रपती ?
नवी दिल्ली- एनडीएने राष्ट्रपतीच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केली. एनडीएने महिलांना संधी देणार असल्याचे सांगत आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू यांच्या नावाची घोषणा केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयात झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जुलै महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए विरोधीपक्ष वतीने माजी अर्थमंत्री यशवंत […]