मुंबई- राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात शपथ घेतली.दुपारी राज्यपालांना भेटल्यानंतर पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी आपण कुठलेही पद घेणार नाही असे म्हटले होते मात्र दिल्लीतून सूत्र हलली आणि संध्याकाळी शिंदे यांच्यासोबत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आलेल्या भूकंपानंतर भाजपच्या […]
अखेर उद्धव ठाकरेंचा राजीनामा !
मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर अखेर राजीनाम्याची घोषणा केली.लवकरच ते राज्यपाल यांच्याकडे आपला राजीनामा पाठविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ठाकरे राजीनामा देणार असल्याचे वृत्त न्यूज अँड व्युज ने आज दुपारीच दिले होते,त्यांच्या राजीनाम्याने आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे.सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेची याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला.त्याचसोबत […]
गुप्तधनाच्या लालसेपोटी मांत्रिकाने नऊ जनांचा जीव घेतला !
सांगली- गुप्तधन काढून देण्यासाठी मांत्रिकाला तब्बल 70 ते 80 लाख रुपये दिले.हे पैसे सावकाराकडून घेतले होते,सावकार तगादा लावू लागल्याने मांत्रिकाला वारंवार विचारणा सुरू झाली,शेवटी हा तगादा सहन न झाल्याने मांत्रिकाने मित्राच्या मदतीने तब्बल नऊ जणांना जेवणातून विष देऊन त्यांचा खून केला.ही थरारक घटना उघडकीस आली आहे सांगली जिल्ह्यात म्हैसाळ येथे. कोट्यवधींचे गुप्तधन मिळवून देतो म्हणून […]
विधानसभा बरखास्त !
मुंबई – बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चाळीस पेक्षा अधिक सेना आमदार असल्याने सेनानेतृत्वाकडून शिंदे यांना समजावण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे चित्र आहे.त्यामुळे सेना नेते संजय राऊत यांचे ट्विट चर्चेत आले आहे.महाराष्ट्राचा प्रवास विधानसभा बरखासतीच्या दिशेने असे ट्विट राऊत यांनी केले आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या चाळीस आमदारांना आसाम मधील गुवाहाटी येथे हलविण्यात […]
शिंदेंसह 40 आमदारांना गुवाहाटी ला हलवले !
गुवाहाटी – शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल 40 आमदारांना सुरत वरून आसाम कडे रात्रीतून हलविण्यात आले आहे. गुवाहाटी येथील रेडिसन हॉटेलमध्ये या आमदारांना ठेवण्यात आले आहे.दरम्यान आपण पक्ष सोडलेला नाही अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह या बंडखोर आमदारांनी सूरत येथे प्रयाण केले होते. ले मेरेडियन या हॉटेलमध्ये ते होते. […]
पूर्णवादीच्या मैदानात पारनेरकर !
बीड- मराठवाड्यात नावाजलेल्या पूर्णवादी नागरी सहकारी बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत यंदा विद्यमान सत्ताधारी संचालक मंडळाकडून पारनेरकर महाराज यांचे चिरंजीव लक्ष्मीकांत पारनेरकर हे मैदानात उतरणार आहेत.त्या दृष्टीने त्यांनी फिल्डिंग लावली असून मतदार,सभासद आणि हितचिंतक यांच्या गाठीभेटीवर जोर दिला आहे. पूर्णवादी बँक म्हणजे वझे आणि पारनेरकर महाराज यांच्या संकल्पनेतून उदयास आलेलं सहकार चळवळीतील एक मोठं नाव.बँक कोतवाल […]
एसीएस राठोड यांचे डीमोशन अन बदली !
बीड- कोरोनाच्या काळात रेमडिसिव्हीर इंजेक्शन मध्ये केलेला काळाबाजार असो की कंत्राटी पदभरती मध्ये कमावलेले लाखो रुपये अथवा रक्तपेढी विभागातील मनमानी या सगळ्या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त शल्य चिकित्सक डॉ सुखदेव राठोड यांना मोठा दणका बसला आहे.राठोड यांचे वैद्यकीय अधिकारी म्हणून डीमोशन करत त्यांची उस्मानाबाद येथे बदली करण्यात आली आहे. या कारवाई नंतर तरी डॉ राठोड […]
पाऊस नाही अन पिककर्जही नाही !
बीड- मराठवाड्यावर वरूण राजाने तर अवकृपा केली आहेच पण बँकानी देखील वक्रदृष्टी दाखवली आहे.दहा हजार कोटी रुपयांचे टार्गेट असताना केवळ दोन हजार कोटी रुपये कर्जवाटप झाल्याने बळीराजा अडचणीत आला आहे.काही भागात तर दुबार पेरणीची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सरकारने शेतकऱ्याला मदतीचा हात देण्याची मागणी होत आहे. मराठवाडा विभागात औरंगाबाद जिल्ह्यात 387.19 […]
धनंजय मुंडेंच्या आग्रहावरून गडकरी येणार परळीत !
नवी दिल्ली- देशाचे रस्तेविकास मंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते नितीन गडकरी यांनी धनंजय मुंडे यांचा आग्रह मंजूर केला आहे.पुढील महिन्यात विविध विकास कामांसाठी स्वतः गडकरी हे परळीत येत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज (दि. 16) नवी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी […]
गुन्हा दाखल असल्यामुळे नोकरी नाकारता येणार नाही !
बीड- एखाद्या उमेदवाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला म्हणून त्याला सरकारी नोकरी नाकारता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल न्यायालयाने दिला आहे.जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल पुणे व नागपूर कारागृह शिपाई पदी झालेली नियुक्ती अवैध ठेवल्याप्रकरणी मॅट मध्ये गेलेल्या उमेदवारांना यामुळे दिलासा मिळाला आहे. जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल, पुणे व नागपूर काराग्रह शिपाई पदी निवड झालेल्या उमेदवाराना पुणे पोलीस भरती मध्ये […]