News & View

ताज्या घडामोडी

Tag: #बीडन्यूज

  • शेकडोंच्या काळजाचा ठोका चुकवणारी एक अफवा अन ज्ञानराधामध्ये प्रचंड गर्दी !

    बीड- केवळ भारतातच नाही तर विदेशातही तिरुमला हा ब्रँड आणि बीड च नाव पोहचवणाऱ्या द कुटे ग्रुपच्या कार्यालयावर इन्कम टॅक्स विभागाने तपासणी सुरू केली अन बीडमध्ये कुटे अडचणीत आल्याची अफवा पसरली.त्याचा फटका सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा पतसंस्थेला बसला आहे.पतसंस्थेमधून ठेवी काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.एका अफवेमुळे हजारोंच्या काळजाचा ठोका चुकला असून त्यामुळे ज्ञानराधामध्ये प्रचंड गर्दी…

  • तब्बल 21 दिवस दिवाळीच्या सुट्या !

    बीड- जिल्हा परिषदेच्या शाळांना आणि खाजगी शाळांना दिवाळीच्या सुट्या 6 नोव्हेंबर पासून असतील.तब्बल 21 दिवस ही सुट्टी असणार आहे.28 नोव्हेंबर रोजी शाळा पुन्हा सुरू होतील असे आदेश जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी यांनी काढले आहेत. राज्यातील सर्वच शाळांना वर्षभरात एकूण 76 सुट्या दिल्या जातात.त्यामध्ये उन्हाळी सुट्या आणि दिवाळीच्या सुट्यांचा विशेष समावेश असतो.बीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत…

  • आदित्य धन्वे सस्पेंड ! दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई कधी !!

    बीड- बलात्काराचा दाखल असलेला गुन्हा दडवून जिल्हा परिषदेत नोकरी मिळणाऱ्या आदित्य अनुप धन्वे यास दहा वर्षाची शिक्षा ठोठावल्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी निलंबित केले आहे.मात्र त्याला चारित्र्य प्रमाणपत्र देणारे पोलीस अधिकारी, रुजू करून घेणारे जिल्हा आरोग्य अधिकारी आणि ओळख दाखवून साक्षांकन देणारे समाज कल्याण अधिकारी यांच्यावर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित…

  • सत्ताधाऱ्यांच्या कार्यकर्त्यांना मिळणार कुरण !

    बीड- राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालये,वैद्यकीय महाविद्यालय आणि औषध भांडार येथे रुग्णसेवेसाठी लागणारी औषधे स्थानिक पातळीवर खरेदी करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे.यामुळे आता सत्ताधारी मंडळींच्या कार्यकर्त्यांना आणि गुत्तेदारांना खाण्यासाठी कुरण उपलब्ध होणार आहे. नांदेड येथील स्व शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 तासात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली. हे मृत्यू…

  • बलात्कारातील आरोपी करतोय जिल्हा परिषदेत नोकरी !

    बीड- अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणात दहा वर्षाची शिक्षा झालेला आरोपी आदित्य अनुप धन्वे हा बोगस चारित्र्य प्रमाणपत्र जोडून शासनाची फसवणूक करत तब्बल सहा वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सेवेत असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. जिल्हा परिषद सीईओ अविनाश पाठक यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बीड जिल्हा परिषद मध्ये मार्च 2019 साली आदित्य अनुप…

  • पोराबाळासहित गुत्तेदारी करणाऱ्या लाड कडे कार्यकारी अभियंत्याचा चार्ज !

    बीड- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जल जीवन मिशन योजनेचा बीड जिल्ह्यात बट्याबोळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई ऐवजी त्यांचे लाड होऊ लागले आहेत.आपल्या मुलाला अन नातेवाईकांना कोट्यवधी रुपयांची कामे देऊन गुत्तेदारी करणाऱ्या एम आर लाड कडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज देऊन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने नेमकं काय साध्य केलं आहे असा सवाल उपस्थित होत आहे. बीड जिल्हा…

  • सावकार भिडले ! जालना रोडवर दगडफेक, काहीकाळ तणाव !!

    बीड- बीड शहरातील जालना रोडवर सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सावकारांचे दोन गट एकमेकाला भिडले.यामध्ये कोठारी नामक सावकारांना जोरदार मारहाण झाली तर त्यांच्या माणसांनी दुसऱ्या गटातील लोकांवर दगडफेक केली. या सगळ्या प्रकारामुळे काहीकाळ जालना रोडवर तणाव निर्माण झाला होता. सोमवारी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास कोठारी नामक सावकार आणि प्लॉटिंग चा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे…

  • राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत येण्यामुळे माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह – पंकजा मुंडे !

    मुंबई- शिवसेना आणि भाजप युती सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश झाला आणि यामुळे माझ्या अस्तित्वावर आणि मतदारसंघावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले सतत मी याला भेटले त्याला भेटले याची ऑफर त्याची ऑफर अशा चर्चा सुरू झाल्याने मी दोन महिने सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला असा खळबळ जनक खुलासा भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केला. पंकजा…

  • आता थेट मंगळवारी सरकारी कार्यालय उघडणार !

    मुंबई- गणेश विसर्जन अर्थात अनंत चतुर्दशी आणि ईद ए मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने देणायत आलेली गुरुवारची शासकीय सुट्टी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी आता शुक्रवारी सुट्टी असेल,त्यामुळे सरकारी कार्यालये थेट मंगळवारी उघडतील. अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी २८ सप्टेंबरला होणार असून गर्दी आणि मिरवणुकांचे…

  • ऐतिहासिक निर्णय ! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर !

    नवी दिल्ली- लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देणारे महिला आरक्षण विधेयक लोकसभेत दोन तृतीयांश इतक्या मोठ्या मताने मंजूर झाले.2026 नंतर जनगणना होईल आणि त्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना होऊन 2029 पासून याची अंमलबजावणी होईल. केंद्रीयमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी संसदेत हे विधेयक मांडले.आरक्षणाच्या बाजूनं 454 मते पडली आहेत. त्यामुळे दोन तृतीयांश मतांनी महिला आरक्षण विधेयक…